कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जर दोन तास मागितले असते, तर..- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचे नाही का? असे त्यांनी म्हटले आहे.

चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खर नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो असेही पाटील म्हणाले.

पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. जेवढे लॉकडाऊनमध्ये कडक नव्हते त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी नेमके करायचे तरी काय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे.

आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागली. असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.