४० मिनिटे मिळाले असते तर झाले असते लग्न, पण..; पहा कोर्टातील थरारक फिल्मी सीन

 

जोधपूर | चित्रपटात बऱ्याचवेळा एखादे प्रेमी जोडपे पळून जाऊन कोर्टात लग्न करणार असते आणि तितक्यात घरचे येऊन हे लग्न थांबवून टाकतात. असे तुम्ही पाहिले असेल.

हे जरी खूप फिल्मी वाटत असेल पण अशीच एका घटना राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडली आहे. एक प्रेमी जोडपे कोर्टात जाऊन लग्न करत असतानाच तरुणीचे कुटुंब आले आणि हे लग्न मोडून टाकले.

हा तरुण मुलीच्या मित्राचा भाऊ होता. त्यामुळे ती मुलगी त्या मुलाच्या घरी येत जात होती. त्याच वेळी, तरूण आणि मुलीची ओळख पटली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.

तीन दिवसांपूर्वीच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले होते. त्यानंतर दोघांनीही प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघे घराबाहेर पळाले आणि कोर्टात लग्न करायला गेले. मात्र तितक्यात कोर्टात कुटुंब आल हे लग्न थांबवले.

तसेच त्या तरुणाविरोधात मुलीच्या घरच्यांनी खांडा फलसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलीला पळवून नेल्याबद्दल त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हे लग्न सुरू असताना हे पूर्ण एका चित्रपटाच्या सीनसारखे वाटत होते. जर कुटुंब आणखी ४० मिनिटे उशिरा आले असते तर कदाचित हे लग्न झाले असते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.