Election Commission : महारष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कालच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले अधिकृत नाव दिले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे.
तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात नाराजीचे वातावरण आहे. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
यामध्ये आता अनिल देसाई यांचा पण समावेश झाला आहे. त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिंदे गटाला जे हवे असते, तेच कसं काय मिळते असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतांना आयोगाला सल्ला पण दिला आहे.
ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य केला आहे. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सामन्य जनता सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहे. एका चांगल्या लोकशाही देशात निवडणूक आयोगाने लोकांचे काय मत आहे, हे पण पाहणे गरजेचे आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, शिंदे गटाला जे हवे असते, जे ते बोलतात, काही गोष्टी तर ते अगोदरच जाहीर करून टाकतात. आणि त्यांच्या मनासारखच निर्णय पण येतो. या गोष्टी वर आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी या वेळी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
अनिल देसाई हे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांचे जवळचे व्यक्ती मानले जाते. त्यांचा कायदाचा पण चांगला अभ्यास आहे. ठाकरे गटाच्या वतीने तेच कोर्टात कायदेशीर बाबी बगतात.
महत्वाच्या बातम्या
China: १९६७ मध्ये भारताने चीनला चारली होती धुळ, ३ किलोमीटर मागे पळून गेली होती चिनी सेना
Sharad Pawar : चिन्ह गेल्याने शिवसेनेला फरक पडणार नाही, उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
Saif Ali Khan video : सैफ अली खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘याचा हिंदू धर्मावर विश्वास नाही’