‘तुझे गाणे ऐकण्यापेक्षा मी विष पिणे पसंत करेन’, असं म्हणणाऱ्या ट्रॉलर्सची टोनी कक्करने केली बोलती बंद

मुंबई। बॉलिवूडमधील अनेक कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. अशातच लोकप्रिय गायिका नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंहचे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे नाव कांटा लगा, असून हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

मात्र अनेकांनी या गाण्याला भन्नाट ट्रोल केलं आहे. या गाण्यात नेहा आणि हनी सिंगचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. नेहाला कांटा लगा या गाण्यात गातांना पाहून तिचे चाहते आनंदीत झाले आहेत. यो यो हनी सिंग पुन्हा एकदा त्याच्या देसी अंदाजात दिसत आहे. पण हे गाणे पाहून एका यूजरने टोनी कक्करला ट्रोल केले आहे.

टोनीला अनेकदा त्याच्या गाण्यांवरून ट्रोल केले जाते. मात्र यावेळी टोनीला ट्रॉलर्सने टोमणा मारला आहे. एका टीकाकाराने टोनी कक्करला प्रतिक्रिया देत लिहिले की, “सर तुमची गाणी ऐकण्यापेक्षा मी विष खाऊन मरणे पसंत करेल.” व यानंतर आता याच टीकेला टोनीने भन्नाट उत्तर दिल आहे.

ट्रोलरला उत्तर देत टोनी म्हणाला, ‘तुम्ही जीव देऊ नका. माझे गाणे कधीच ऐकू नका. तुमचे आयुष्य हे खूप महत्वाचे आहे. १०० टोनी कक्कर येतील आणि जातील.’ टोनीने दिलेले उत्तर पाहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले आहे.

टोनीने आणखी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “मी अनेक गाणे बनवतो. त्यामध्ये अनेक प्रेमगीतांचाही समावेश आहे. मात्र, तुम्ही लोक नेहमी फक्त नृत्य गाण्यांबद्दल बोलता. तुम्ही त्यांनाच मोठे करता. त्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही लोक समजून घ्या मला काय म्हणायचे आहे.”

कांटा लगा या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही तासातच प्रेक्षकांना हे गाणं प्रचंड आवडलं आहे. रिलीज झाल्यावर काही तासातच हे गाणे 34 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्याची निर्मिती देसी म्युझिक फॅक्ट्रीने केली आहे.

देसी म्युझिक फॅक्टरीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंशुल गर्ग यांनी गाणे रिलीज झाल्यानंतर सांगितले की, प्रेक्षक काटा लगाची आतुरतेने वाट पाहत होते. आम्ही हे गाणे जगभरातील नेहा, टोनी आणि हनीच्या चाहत्यांना समर्पित करतो.
महत्वाच्या बातम्या
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..
टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा भीषण अपघात; अपघातात गंभीर जखमी 
मोठी बातमी! आता Whatasapp वरून पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या कसे…
सैफ अली खानच्या घरी बाप्पा विराजमान; तैमुरने स्वत:च्या हाताने बनवलेल्या मुर्तीचे सर्वत्र कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.