…म्हणून कोरोना उपचारात मास्टरस्ट्रोक ठरलेली प्लाझ्मा उपचारपद्धती केंद्र सरकार रद्द करणार

दिल्ली | कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतात अजूनही कोरोनाच्या लसींवर काम सुरू आहे. पण त्याचबरोबर काही उपचार पद्धतीने कोरोनारुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यातीलच एक उपचार होता प्लाझ्मा थेरपी.

प्लाझ्मा थेरपीला काही दिवसांपूर्वी खूप प्रभावी मानले जात होते पण आता ICMR प्लाझ्मा थेरपीला बंद करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल ICMR ने महत्वाची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरत नसल्याचे समोर आले आहे.

मृत्युदर रोखण्यातही ही थेरपी आयशस्वी ठरली आहे. अशी माहिती ICMR चे बलराम भार्गवा यांनी दिली आहे. त्यांनी आज पत्रकात परिषद घेतली होती. प्लाझ्मा थेरपीबाबत बोलताना ते म्हणाले, अनेक अभ्यासानंतर असे लक्षात आले आहे की, प्लाझ्मा थेरपी कोरोनापासून होणाऱ्या मृत्युदर रोखण्यात फारशी परिणामकारक ठरलेली नाही.

त्यामुळे कोरोनासाठी बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून तिला काढून टाकण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्यानंतर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, प्लाझ्मा थेरपी रुग्णांवर प्रभावी असल्याचे बोलले जात होते पण नंतर याच थेरपीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अँटीसेरा उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. म्हणजे प्राणी रक्तद्रव्य चाचणी करण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.