दिलासादायक बातमी! देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा

आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दावा केला आहे की देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे. तसेच त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की जरी कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी तीव्रतेची असेल.

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाने हाहाकार माजवला होता तेव्हा रमन गंगाखेडकर हे आयसीएमआरचे मुख्य चेहरा होते. त्यांनी मुलाखतीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले.

शाळा सुरू करण्याबाबत ते म्हणाले की देशात जरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जरी कमी असली तरी शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयासाठी कोणतीही घाई करू नये. कारण नव्या अभ्यासानुसार लहान मुलांमध्ये कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम दिसून आले आहेत.

शाळा उघडण्याचा निर्णय सरसकट घेतला जाऊ नये. कोरोना रूग्णसंख्येच्या आधारे ठराविक क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी असाही विश्वास व्यक्त केला की, कोविड-१९ इन्फ्लूएन्झा व्हायरस संपू शकतो.

तसेच कोरोना प्रतिबंधक लसीमुळे आता कोरोनाबाधित रूग्ण हे लक्षणेहीन म्हणजेच asymptomatic असू शकतात किंवा त्यांना अगदी सौम्य लक्षणं जाणवू शकतात. पर्यायाने चाचण्यांची आणि कोरोनाबाधित रूग्णांची संख्याही कमी होऊ शकते, असेही ते म्हणाले आहेत.

चौथ्या सिरोच्या सर्वेनुसार देशातील सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये ऍन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. देशात जशीजशी लसीकरणाची व्याप्ती वाढेल तसेतसे देशातील हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि मृत्युमुखी पडणाऱ्या प्रकरणांची नोंद कमी होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या
‘ओ नारी मनहारी, सुकुमारी…’ प्रिया बापटचा मनमोहक रील व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ
किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ संतापले
कंगना राणौतच्या ‘थलायवी’ने आतापर्यंत किती पैसे कमावले आहेत? आकडा ऐकून धक्का बसेल
ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.