कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार होणार नाही; आयसीएमआर आणि एम्सचा मोठा निर्णय

देशभरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रोज साडे तीनलाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार केले जाणार नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार केले जाणार नाही. प्लाझ्मा थेरेपीला कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या पद्धतींमधून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत आयसीएमआरने गाईडलाईन्स तयार केल्या आहे.

गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता, तेव्हा कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीनेच उपचार करण्यात येत होते. तसेच हा उपचार खुप प्रभावी ठरत असल्याचे काही डॉक्टरांनी म्हटले होते. हा उपचार फक्त भारतातच नाही तर जगभरात सुरु होता.

आता मात्र कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या थेरेपीचा वापर केला जाणार नाही, असे एम्स आणि आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे प्लाझ्मा थेरेपी कोरोना रुग्णांवर प्रभावी होती, तरीही कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतींमधून प्लाझ्मा थेरेपी हटवल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्लाझ्मा थेरेपी इतकी प्रभावी ठरत नाही, जितकी पहिल्या कोरोना लाटेमध्ये प्रभावी ठरत होती. त्यामुळेच आता प्लाझ्मा थेरेपीला उपचारपद्धतीतून बाहेर काढण्यात आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

तसेच नेदरलँड आणि चीनमध्ये प्लाझ्मा थेरेपीवर संशोधन करण्यात आले होते. त्या संशोधनात अशी माहिती समोर येत आहे, की प्लाझ्मा थेरेपी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रभावी ठरत नाहीये, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चाळीशीतल्या करिश्माने घातले इतके बोल्ड कपडे की तिच्यासमोर करीनाही पडली फिकी; पहा फोटोज
‘मुलगी झाली हो’ मधील माऊ आणि सिद्धार्थचा भन्नाट डान्स तुफान व्हायरल; एकदा पहाच
मेक्सिकोची ऍन्ड्रिया मेझा ठरली ‘मिस युनिव्हर्स’; पहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.