अरे बापरे! ‘हा’ कर्मचारी आईसक्रिम टेस्ट करण्यासाठी घेतो करोडो रुपये; वाचा त्याच्याबद्दल

जॉन हॅरिसन हे मुळतः अमेरिकन रहिवासी असून त्यांचा जन्म १९४२ साली झाला. ते एक अमेरिकन आईस्क्रीम टेस्टर आहे, ज्यांनी ‘ड्रेयर्स’ या आइसक्रीम कंपनीत “ऑफिशियल टेस्ट टेस्टर” म्हणून काम केले. आज आपण त्यांच्या अनोख्या कौशल्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हॅरिसनचे संपूर्ण कुटुंब त्यांचे आजोबा पर्यंत, सगळेआईस्क्रीम उद्योगात कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुंतले होते. त्याच्या लहानपणी ते  त्यांच्या काकांच्या मालकीच्या आईस्क्रीम फॅक्टरीत मदत करत असे. हॅरिसन यांचे लग्न झाले असून ते सध्या कॅलिफोर्नियामधील पाम डेझर्ट येथे वास्तव्यास आहेत.

हॅरिसन यांच्या जिभेला इतकी चव समजते की ते पदार्थ टेस्ट करण्याचे करोडो रुपये कमवतात आणि त्यांनी त्याचा  तब्बल दहा लाख डॉलर्सचा विमा उतरवला आहे.  ते अत्यंत कठोर आहाराचे पालन करतात,  जेणेकरून त्याच्या चाखण्याच्या कौशल्यावर परिणाम होऊ नये.

हॅरिसन हे १९५६ मध्ये ड्रेयरस या आयस्क्रीम कंपनीत कामास रुजू झाले व ते २०१० मध्ये निवृत्तीपर्यंत सेवा बजावत होते.  ते दररोज सरासरी ६० आइसक्रीम फ्लेवर्सचा स्वाद घेत होते.  हॅरिसन आईस्क्रीम खात नाही तर चव घेऊन थुंकतात. त्यांच्या स्वतःच्या अंदाजानुसार, त्यानी ड्रेयर्स येथे काही शंभर दशलक्ष गॅलन आईस्क्रीम चाखल्या.

हॅरिसन यांनी शंभराहून अधिक विविध आईस्क्रीम फ्लेवर्स तयार करण्यास मदत झाली  आहे. एका स्त्रोताच्या अहवालानुसार त्याने कुकीज एन क्रीम या चवीचा शोध लावला होता. जागतिक अहवालानुसार हॅरिसन ‘यांच्या चव घेण्याची क्षमता इतकी  बारीक आहेत की उत्पादनात ते १२ -टक्के आणि ११.५-टक्के बटरफॅट फरक लगेचच ओळखू शकतात’. तसेच हॅरिसन यांची चव घेण्याची शक्ती इतकी प्रबल आहे की ते चव घेऊन सांगू शकतात एखादी आईस्क्रीम मार्केटमध्ये चालू शकते की नाही.

हॅरिसन यांना अमेरिकेत सर्वात लोहीकप्रिय आईस्क्रीम मॅन असेही नमूद केले आहे. हॅरिसन स्वत: ला आईस्क्रीमचा पहिला राष्ट्रीय प्रवक्ता असल्याचे ही मानतात. ते बर्‍याच टेलिव्हिजन प्रोग्रामवर तसेच इतर माध्यमांवरही दिसले आहे. १९९७  मध्ये हॅरिसन यांना अमेरिकन टेस्टिंग इन्स्टिट्यूटच्या ‘मास्टर टेस्टर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा-

तिसरी लाट सुरू, मुलाबाळांना जपा! ‘या’ राज्यात १० दिवसात तब्बल १००० मुलांना कोरोना

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते अगदी खर; पहा उर्मिला कोठारे आणि चिमुरड्या जीजाचा डान्स

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.