पहिल्या सामन्यातील पराभवाचा धक्का पचवाण्याआधीच भारतीय संघाला आणखीन एक धक्का

सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ रनने पराभव केला. पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंना धक्का बसला. हा धक्का पचवायच्या आधीच आता भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. आता भारतीय संघाच्या खेळाडूंच्या मानधनातून आता २० टक्के रक्कम दंड म्हणुन भरावी लागणार आहे.

पहिल्या सामन्यानंतर आयसीसीने भारतीय संघाला शिक्षा केली आहे. कारण या सामन्यात भारतीय संघाला निर्धारीत वेळेत आपली ५० षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे आता आयसीसीने भारतीय संघावर दंड ठोठावला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला आपल्या मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

सामनाधिकारी आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बून यांनी भारतीय संघाला निर्धारीत वेळेत आपली ५० षटके पूर्ण करता आली नाहीत, हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयसीसीने ही कारवाई केली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आपली ही चूक मान्य केली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळेभारतीय संघाच्या खेळाडूंच्या मानधनातून आता २० टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.

मुंबईला पाकव्याप्त कश्मीर, मुंबई पोलीसांना माफीया म्हणने भाजपला मान्य आहे का?

बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली, हृतिक रोशन आता चांगले वाटताहेत; कंगनाचे धक्कादायक विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.