Share

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, 3717 जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

IB Recruitment : देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये भरतीची मोठी संधी निर्माण झाली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/कार्यकारी (ACIO Grade-II/Executive) या पदासाठी एकूण ३७१७ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून, १९ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १० ऑगस्ट २०२५ पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

पदांची माहिती आणि आरक्षणानुसार तपशील:

  • एकूण जागा – ३७१७

  • सामान्य प्रवर्ग (UR) – १५३७
  • अनुसूचित जाती (SC) – ५५६
  • अनुसूचित जमाती (ST) – २२६
  • इतर मागासवर्गीय (OBC) – ९४६
  • ईडब्ल्यूएस (EWS) – ४४२

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

१० ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार सूट लागू होईल.

परीक्षा फी:

  • सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – ₹६५०/-

  • SC/ST/अपंग उमेदवारांसाठी – ₹५५०/-

वेतनश्रेणी:

नियोजित उमेदवारांना ₹४४,९००/- ते ₹१,४२,४००/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

  • अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in ला भेट द्यावी.

  • अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्जासाठी संबंधित लिंक लवकरच उपलब्ध होणार आहे.

ही भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे इच्छुक पदवीधर उमेदवारांनी संधीचं सोनं करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now