IB Recruitment 2025 : देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) मोठी भरती जाहीर झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही संधी केवळ १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुली असून तब्बल ४,९८७ पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये उमेदवारांना सुरुवातीला आकर्षक पगारासोबत सरकारी सेवा व प्रतिष्ठेची संधी मिळणार आहे.
कोणत्या पदासाठी आहे भरती?
या भरतीअंतर्गत सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (Security Assistant/Executive) पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. ही पदे देशभरात विविध ठिकाणी भरली जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर (Across India) राहणार आहे.
पदाचे नाव | एकूण जागा | पात्रता | पगार |
---|---|---|---|
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह | 4987 | 10वी उत्तीर्ण | ₹21,700 ते ₹69,100 |
वयोमर्यादा किती?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १७ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. आरक्षणानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.
-
SC/ST वर्गासाठी: ५ वर्षांची सूट
-
OBC वर्गासाठी: ३ वर्षांची सूट
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?
-
अर्ज सुरु होण्याची तारीख: २६ जुलै २०२५
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२५
-
परीक्षा कधी?: परीक्षा तारीख लवकरच कळवण्यात येईल
अर्ज फी किती?
-
जनरल/OBC/EWS: ₹६५०
-
SC/ST/महिला/ExSM: ₹५५०
अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, उमेदवारांनी www.mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. शॉर्ट व सविस्तर जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज लिंक संबंधित वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
उपयुक्त लिंक्स:
-
अधिकृत संकेतस्थळ: www.mha.gov.in
-
सविस्तर जाहिरात पाहा: येथे क्लिक करा
-
ऑनलाईन अर्ज करा: येथे क्लिक करा