२ वर्षांच्या वयात दोन्ही डोळे झाले निकामी, पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करून बनला IAS

अशा अनेक कहाण्या असतात ज्या आपल्याला आकर्षित करतात आणि आपल्याला आत्मविश्वास देतात. अशीच अक कहानी आहे दृष्टीहीन असलेल्या आयएएस राकेश शर्मा यांची. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास करून आयएएस पद मिळवले आहे.

त्यांनी आपल्या परिवाराचे नाव मोठे केले आणि दाखवून दिले की मेहनत करणाऱ्या लोकांचा कधीच पराभव होत नाही. राकेशला पाहून बरेच लोक त्यांच्या आईवडिलांना म्हणाले होते की त्याला अनाथ आश्रमात सोडून या पण त्याच्या परिवाराने त्यांची साथ दिली.

त्यांना त्यांच्या परिवाराची खुप साथ मिळाली. राकेश हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सावंड या छोट्याशा गावात राहतात. दोन वर्षांचे असताना त्यांचे डोळे निकामी झाले. त्यांना पुर्णपणे दिसायचे बंद झाले.

पण त्यांच्या परिवाराने त्यांना खुप साथ दिली. राकेशचे दोन्ही डोळे एका औषधाच्या रीऍक्शनमुळे गेले होते. त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांची स्थिती बघून त्यांना सामान्य शाळेत दाखला मिळत नव्हता.

त्यांनी मग एका स्पेशल शाळेत शिक्षण घेतले. बारावीपर्यंत स्पेशल स्कुलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. यानंतर त्यांचा खुप आत्मविश्वास वाढला.

राकेश म्हणाले की, दिल्ली विश्वविद्यालयात ज्या एक्टीव्हिटीज होत असत त्यामुळे आणि शिक्षकांचा पाठिंब्याने त्यांना जीवनाच्या अनेक बाजू समजल्या. त्यांना काहीतरी मोठं करण्याची इच्छा झाली. दिल्ली नॉलेज ट्रॅकशी बोलताना राकेशने अनेक गोष्टी सांगितल्या.

२०१८ मध्ये त्यांनी पहिल्या प्रयत्नातच UPSC परिक्षा पास केली आणि आयएएस बनले. राकेश लहानपणापासूनच अभ्यासात खुप हुशार होते. दिल्लीत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ठरवले की आपण देश सेवा करायची. समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी आयएएस बनण्याचे स्वप्न बघितले होते.

त्यांचे हे स्वप्न पुर्ण झाले. अभ्यास करून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षेत ६०८ वा रॅँक मिळवला आणि आयएएस पद मिळवले. राकेश म्हणाले की माझ्या आई वडिलांमुळेच मी आयएएस होऊ शकलो. त्यांना शिक्षकांचीही भरपूर साथ भेटली. त्यांनी दिवस रात्र अभ्यास करून यश मिळवले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.