Homeइतरना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत:...

ना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत: बोऱ्या बिस्तर घेऊन गेले निघून

सध्या बिहारमध्ये आयएएस अधिकाऱ्याचा साधेपणा चर्चेचा विषय ठरत आहे. या IAS अधिकाऱ्याने असे काही केले की त्याचा साधेपणा लोकांच्या मनाला भिडला. सामान्यत: कोणत्याही जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर भव्य निरोप समारंभ आयोजित केला जातो. त्यानंतर त्यांना मोठ्या आदराने निरोप दिला जातो.

परंतु हा अधिकारी अत्यंत साधेपणाने त्याच्या बदलीचे पत्र घेऊन तेथून निघून गेला. हा आयएएस अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृह जिल्ह्याचे डीएम असलेले योगेंद्र सिंह आहेत. नालंदाचे ३७ वे जिल्हा दंडाधिकारी असलेले योगेंद्र सिंह यांचा साधेपणा त्यावेळी त्यांच्या बदलीनंतर दिसला, तेव्हा त्यांचे नाव सर्वांच्या जिभेवर होते.

सोशल मिडीयावर सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे खुप कौतुक केले आहे. खरं तर त्यांनी नालंदामध्ये कोणालाही न सांगता निरोप घेतला. प्रकरण इथेच संपले नाही, त्यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित फेअरवेल पार्टीलाही या अधिकाऱ्याने नकार दिला.

निरोप समारंभाला नम्रपणे नकार दिल्यानंतर त्यांनी जनतेचे आभार मानले. योगेंद्र सिंह यांनी निरोप देताना कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेतला नाही. अंगरक्षकाला नवीन डीएमसोबत राहण्याचा सल्ला देत योगेंद्र हातात ट्रॉली बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघून गेले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतरही त्यांचा साधेपणा कायम होता. सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे राहून त्यांनी रेल्वेचे तिकीट काढले आणि श्रमजीवी एक्स्प्रेसने पाटण्याकडे रवाना झाले.

मूळचे उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले योगेंद्र सिंह यांची नालंदा येथून समस्तीपूरच्या जिल्हा दंडाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी 35 महिने मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील नालंदा येथे जिल्हा दंडाधिकारी पद भूषवले. योगेंद्र सिंग हे कामाच्या बाबतीत एक भडक आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या कार्यकाळात त्यांचे अनेक निर्णय लोकांच्या मनाला भिडले आहेत. नालंदाला निरोप देण्यापूर्वी त्यांनी आपला कार्यभार महापालिका आयुक्त तरनजीत सिंह यांच्याकडे सोपवला, इतकेच नाही तर त्यांनी आपल्या मोबाईलचे सरकारी सिमही डीडीसीकडे सुपूर्द केले आहे. या अधिकाऱ्याचा साधेपणा पाहून लोकांनी त्यांना सॅल्युट केले आहे. आजच्या काळात असे अधिकारी खुप कमी पाहायला मिळतात.

बदलीनंतर योगेंद्र सिंह ज्या पद्धतीने नालंदाहून निघून गेले, अशा गोष्टी क्वचितच कोणत्याही डीएमच्या कार्यकाळात दिसल्या असतील. 2012 बॅचचे आयएएस अधिकारी योगेंद्र सिंह बिहारमधील पाटणा शहराचे पहिले एसडीओ बनले. बेतियाचे विकास आयुक्त आणि नंतर शेखपुराचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केल्यानंतर ते नालंदाचे जिल्हा दंडाधिकारी बनले. नालंदाचे लोक त्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना विसरणे शक्य होणार नाही.

महत्वाच्या बातम्या
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस
आईच्या दुधातील ‘या’ घटकांमुळे बाळाला मिळते कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद
मोठी बातमी! कालीचरणला जामीन मंजूर; भडकाऊ वक्तव्य प्रकरणी झाली होती अटक