कशी झाली शेतकऱ्याची मुलगी आणि गवंडी कामगाराची पत्नी आयएएस?

अमरावती | अमरावती जिल्ह्यात अनोखा प्रकार घडला आहे. जिह्यातील माधुरी गजभिये ही महिला जिल्हाधिकारी झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. जिल्ह्याच्या लेकीची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने पालकमंत्री आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माधुरी गजभिये या महिलेच्या गावी जाऊन तिचा सत्कार केला.

अशात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९च्या उत्तीर्ण यादीत माधुरी गजभिये या महिलेच नावच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोशल मीडियावर माधुरी जिल्हाधिकारी झाल्याबाबतची पोस्ट व्हायरल झाली होती. तसेच काही चुकीची वृत्त प्रसारित झाल्याने मोठा गैरसमज निर्माण झाल्याचे समोर आले आहे. माधुरी गजभिये या महिलेने २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती.

त्यानंतर माधुरीची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. यामुळे तिच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. राजकीय नेते, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ इतकेच काय तर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी माधूरीचा सत्कार केला. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली की, माधुरीचे नाव केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत आलेच नाही.

माधूरी हिच्या माहेर आणि सासरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. माधूरी हिचे वडिल अल्पभूधारक आहेत. तर तिचे पती योगेश हे गवंडी कामगार आहेत. अशा परिस्थितीत माधूरीने स्पर्धा परिक्षेची तयारी केली होती. यावेळी घडलेल्या या प्रकारानंतर माधुरी गजभिये यापुढे कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
पाच वेळा नापास झाला पण जिद्द सोडली नाही! अंगनवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएएस
नऊ तास नोकरी करून ‘या’ महिलेनी केली यूपीएससीची परीक्षा पास
असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही? IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला प्रश्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.