लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली गुडन्युज; बेबी बंपर फोटो व्हायरल

मुंबई : दिया मिर्झाने गर्भवती असल्याची सोशल मीडियावरून घोषणा केल्यानं बॉलिवूडमध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच दीयाने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत समर्क अशी कॅप्शनही दिली आहे.

दीयाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटो दीया फारच सुंदर दिसत आहे. या बातमीनंतर आता बॉलिवूड सेलेब्स आणि त्यांचे चाहते दीया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखी यांचे अभिनंदन करत आहे.

दियाने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी वैभव रेखी सोबत लग्न बंधनात अडकली होती. तिने तिच्या लग्नात अनेक प्रथांना फाटा देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दियाच्या लग्नानंतर तिचा हनिमूनदेखील सोशल मीडियावर बराच चर्चेत होतं. त्याच कारण म्हणजे दिया तिच्या हनिमूनला तिच्या सावत्र मुलीलादेखील घेऊन गेली होती.

दरम्यान, दीयान लग्नानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन म्हणत लग्नाचे खास फोटो शेअर केले होते. दीयाचे हे दुसरे लग्न आहे.

दीया मिर्झाने ऑक्टोबर २०१४ मध्ये साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलला २०१९ मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईत लोकल प्रवासावर निर्बंध? धार्मिक स्थळे, माॅल बंद होणार; महापौरांनी दिले संकेत…

जीव वाचवायचा तर लॉकडाऊन करणे भाग आहे; टोपेंनी दिले १५ दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत

लॉकडाऊनची काही आवश्यक्ता नाही लॉकडाऊनच्या धमक्या देणं बंद करा; कॉंग्रेस नेत्याने सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.