Share

धोनीने संघातून वगळल्यानंतर मी निवृत्ती घेणार होतो पण.., वीरेंद्र सेहवागचे खळबळजनक वक्तव्य

वीरेंद्र सेहवाग हा भारतीय क्रिकेट टीम मधील सर्वात आक्रमक फलंदाजापैकी एक होता. सेहवागची क्रिकेटच्या तिन्हीं फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळण्याची शैली ही एक सारखीच होती. एके काळी सेहवागच्या मनात एक दिवसीय फॉरर्मेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली होती.

पण, सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून सेहवागने निवृत्ती घेण्याचा विचार बदलल्याचं  सांगितले आहे. कर्णधार धोनीने सेहवागला २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. त्यानंतर सेहवागला एक दिवसीय फॉरमॅटमधून निवृत्त व्हायचे होते, पण सचिन तेंडुलकर सेहवागला निवृत्ती घेऊन दिली नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २००८ ला आम्ही होतो तेव्हा माझ्या मनात निवृत्ती घेण्याचा विचार आला होता. कसोटी मालिकेत सेहवागने पुनरागमन करत १५० धावा केल्या होत्या. असे क्रिकबझ शोमध्ये सेहवागने सांगितले आहे. सेहवागला एकदिवसीय सामन्यात देखील धावा करण्यात अपयशी ठरला होता.

सेहवागने तिरंगी मालिकेमध्ये ६, ३३, ११ आणि १४ धावा  केल्या होत्या. यामुळे धोनीने सेहवागला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. तेव्हा सेहवागच्या मनात एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा विचार आला होता. असे क्रिकबझ शोमध्ये सेहवागने सांगितले आहे.

सेहवाग सचिन तेंडुलकरचा उल्लेख करत म्हणाला आहे की, मला त्यावेळी सचिन तेंडुलकर निवृत्ती घेण्यापासून रोखले होते. हा माझ्या जीवनाचा वाईट टप्पा होता. या दौऱ्यानंतर घरी जा आणि नीट विचार करा. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरव. मी नशीबवान होतो की त्यावेळी मी माझ्या निवृत्तीची घोषणा केली नाही. असे सेहवागने सचिन तेंडुलकर बाबत म्हटलं आहे.

दोन सामन्यातून वगळल्यानंतर सेहवागला पुन्हां एकदा  सिडनी क्रिकेट मैदानावर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया विरोधात पुढील दोन साखळी सामन्यात सेहवागची निवड करण्यात आली होती. त्या सामन्यामध्ये सेहवाग केवळ १४ धावा करू शकला होता.

महत्वाच्या बातम्या:-
ट्रॉफी जिंकताच भाऊ क्रुणाल पांड्याने हार्दिकचे केले धुमधडाक्यात स्वागत, म्हणाला, माझ्या भावा…
अक्षता एकमेकांवर फेकण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये झाली हाणामारी, जाग्यावर मोडलं लग्न, वाचा सविस्तर..
गायक केकेच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर; पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती

 

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now