आम्ही तिनही राजे एकच; मी मराठा आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करतो

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना सातारा येथे केली आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढण्याचा या फाऊंडेशनच्या स्थापना करण्यामागचा उद्देश आहे. याचे उद्घाटन खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

खासदार संभाजीराजे भोसले यांना तिन्ही राजे एकत्र येणार का? असा सवाल विचारला असता ते म्हणाले की, आमच्या तिघांच्या भुमिका एकच आहेत, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. कोल्हापुर, सातारा या गाद्या वेगळ्या नाहीत आम्ही एकत्रच आहोत, एकत्र येण्याचा प्रश्नचं येत नाही. असं म्हणतं त्यांनी प्रश्नाला बगल दिली. यावेळी ते पुण्यात बोलत होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने सुरू आहेत. येत्या ५ फेब्रूवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे. त्यासाठी आपल्या वाट पाहावी लागणार आहे. काही कारणामुळं मला औरंगाबादला जाता आलं नाही. आंदोलन मागे घेतलं नसेल तर त्यांनी मागे घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हेच ऐकायचं बाकी होतं! ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच’; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा
पुण्यात ट्रॅफिक पोलिसाने अक्कल काढल्याने कंटेनरचालकाने डोक्यात घातला रॉड
बजेटच्या दिवशी स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, दहा ग्रॅमवर इतक्या रुपयांची सूट
वडीलांनी दिलेला ‘तो’ सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय; खिलाडी अक्षयकुमारने दिली कबुली

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.