देशातील बर्याच राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्तर प्रदेशात बर्ड फ्लू किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाल्याने बाधित राज्यांची संख्या ७ वर पोहोचली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे.
देशात बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारवर अनेक विरोधी पक्ष टिका करत आहेत. आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. आय. पी. सिंह यांनी मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाचा फोटो ट्विट केला आहे.
इस व्यक्ति का क्या करें? पक्षियों को दाना खिलाया तो बर्ड फ्लू की चपेट में आ गए बेचारे। pic.twitter.com/mPWcHCnXzj
— I.P. Singh (@IPSinghSp) January 8, 2021
“या माणसाचं काय करावं?, पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले” असे कॅप्शन देत सिंह यांनी ट्विट केले आहे. बर्फ फ्लूबद्दल अनेक चर्चा होत असताना दररोज देशात काही ठिकाणी पक्षी मृत पावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
हिमाचल प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षी मृत्यूमुखी पडले आहे. हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला. तसेच परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या ८०० कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
जोड्याने मारलं नाही तर नाव सांगणार नाही; संजय राऊतांचा सोमय्यांना जाहीर इशारा
पंगा क्वीन कंगणाने आता तर थेट ट्विटरच्या CEO सोबत घेतला पंगा
नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार