‘होय माझी चूक झाली, पण नियम मोडणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई करा’

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून औरंगाबाद जिल्हाभरात लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. मात्र औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली.

चिंतेची बाब म्हणजे लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती.

जलील यांच्या या कृतीवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असे जलिल यांनी म्हटलं आहे. पण आपली चूक मान्य करतानाच त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे…
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जलील यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘IM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून जलील आणि त्यांच्या पक्षाने जल्लोष केला. परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असे खोपकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

८ तासांच्या चौकशीनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक; ३ एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी

‘गोकुळचा संचालक व्हायचं असेल तर १० लिटर दूध न दमता काढून दाखवा’

सलमानने माझ्या सोबत…; सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने सलमानवर केला ‘हा’ गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.