“मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिलं आहे”, सुशांतच्या आठवणीत अभिनेता झाला भावुक

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह रजपुतने आत्महत्या केल्याने संपुर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या करून जवळपास आठ-नऊ महिने झाले आहेत. सुशांतने आत्महत्या केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

सुशांतच्या आठवणीने अनेकजण व्याकुळ झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक अभिषेक कपुरही सुशांतच्या आठवणीने भावूक झाला आहे. अभिषेक कपुर यांनी सोशल मिडियावर सुशांतसिंह रजपुतच्या ‘काय पो छे’ चित्रपटातील एक शुटींग सीन शेअर केला आहे.

सुशांतला दिग्दर्शक अभिषेक कपुर अभिनय कशा रितीने करायचा हे सीनमध्ये सांगत आहेत. सुशांतही सीन शुट करण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ कपुर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

अभिषेक कपुर म्हणाले की, “ज्यावेळी या चित्रपटाचा क्लायमॅक्स लिहिला गेला. तेव्हा खुप रडलो होतो. चित्रपटाचे शुटिंग पुर्ण झाल्यानंतरही मी रडलो होतो. चित्रपट जेव्हा बॅकग्राउंड स्कोर टाकल्यानंतरही माझं रडणं थांबलं नव्हतं”.

“मी सुशांतला अनेकवेळा मरताना पाहिलं आहे. केदारनाथ मध्येही त्याचा मृत्यु झाला आहे. त्यामुळेच १४ जुन रोजी मला बातमी कळाली तेव्हा मला धक्काच बसला. अजुनही मी या धक्क्यातून सावरलो नाही.”

अभिषेक कपुर यांच्या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी “तुमची आठवण येते सुशांत सर”, “सुशांत अजुनही चाहत्यांच्या मनात आहे”. अशा कमेंट्स केल्या आहेत.

अभिषेक कपुर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काय पो छे’ चित्रपटाला आठ वर्ष पुर्ण झाले आहेत. चित्रपटामध्ये सुशांतसिंह राजपुत, राजकुमार राव, अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेता सुशांतसिंह रजपुतने १४ जून २०२० मध्ये वांद्रे येथील घरात आत्महत्या केली होती. सुशांतने आत्महत्या केली? का त्याची हत्या झाली? यावरून अनेक वाद झाले होते. सुशातच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात नशीब, समुद्रकिनारी फिरताना पायाला लागला दगड अन् ती झाली करोडपती
‘कोंबडी पळाली’ गाण्यावर अमेरिकन व्यक्तीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
आजोबा हे काय करता? जेवणानंतर साताऱ्याचे ‘हे’ आजोबा नियमित खातात  दगडाचे २५० खडे, पण का..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.