Share

गाण्याचे शिक्षण घेतले नाही तरी केले ३५०० हून अधिक गाण्यांवर काम, वाचा केकेच्या न ऐकलेल्या गोष्टी

ज्येष्ठ गायक केके (कृष्णकुमार कुननाथ) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केके कलकत्त्याला कॉन्सर्ट करण्यासाठी गेले होते. येथील कॉन्सर्ट संपल्यानंतर प्रकृती खालावल्याने ते जाग्यावर कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.(KK, Krishnakumar Kunnath, Concert, Singing, Suresh Wadkar, Vinod Sehgal)

गायन जगतातील चमकता तारा, वयाच्या ५३ व्या वर्षी गात असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. पीएम मोदींपासून ते सर्व बड्या व्यक्तींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. केके यांच्या आयुष्याचा प्रवास खूप यशस्वी झाला.

त्यांनी अनेक हिट गाणी दिली, जी आजही लोकांच्या तोंडात आहेत आणि पुढेही राहतील. पण तुम्हाला माहीत आहे का – गायन जगतातील राजा केके कधीही गाणे शिकले नव्हते. चला जाणून घेऊया KK बद्दलच्या अशा न ऐकलेल्या गोष्टी

केकेने ‘तडप-तडप के इस दिल’ या गाण्याने आपल्या गाण्याची सुरुवात केली होती, हे बहुतेकांना माहीत आहे. तथापि, फार कमी लोकांना माहित आहे की केके देखील १९९६ च्या लोकप्रिय चित्रपट ‘माचिस’ मधील ‘छोड आये हम वो गलियां’ गाण्याचा एक भाग होते. या गाण्यात त्यांचे सहगायक हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल होते.

हे गाणे विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले आहे. आजच्या काळातही हे गाणे सुपरहिट आहे. केके यांनी १९९४ मध्ये मुंबईत येऊन गायनाच्या जगात येण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये कामही केले होते. केकेने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. यामध्ये त्यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासात सदैव साथ दिल्याचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी केकेने अनेक जाहिरातींसाठी गाणे गायले. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी आपल्या करिअरमध्ये ३५०० हून अधिक जिंगल्स गायल्या आहेत. केकेने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, दिल्लीत गाणे गाताना गायक हरिहरनची नजर त्याच्यावर पडली. त्यांनीच केके यांना मुंबईत येण्याची प्रेरणा दिली.

केकेने खुलासा केला होता की त्यांनी कधीही गाण्याचे धडे घेतले नाहीत. ते संगीत शाळेत गेले, पण काही दिवसांनी तोही सोडून दिला. सुरुवातीपासून गाणी ऐकून शिकायचे असे त्यांनी सांगितले होते. ही कला त्यांना पहिल्यापासूनच जमली होती.

प्रसिद्ध गायक किशोर कुमार हे केके यांचे प्रेरणास्थान होते. किशोर कुमार कधीच गाणे शिकले नसल्याची माहिती केके यांनी दिली होती. त्यामुळे केकेला संगीत शाळेत न जाण्याचे आणखी एक कारण सापडले. केके हे केवळ बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटांचे गायक नव्हते. तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली, मल्याळम, गुजराती आणि आसामी भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली.

२००५ मध्ये, केकेने फेम गुरुकुल या सिंगिंग शोमध्ये ज्युरीची भूमिका केली होती. या शोमध्ये गायक अरिजित सिंगने देखील भाग घेतला होता. या शोमधूनच अरिजित सिंगला ओळख मिळू लागली. केके यांचा जन्म 1968 साली दिल्लीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षणही दिल्लीत झाले. दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम. केले.

महत्वाच्या बातम्या
IPL 2023 साठी कर्णधार रोहित शर्माने फुकले रणशिंग, म्हणाला, संघातील एकजूटपणा पुढील वर्षी..
कोल्हापूरच्या आकाशात उडणारी ‘ती’ वस्तू म्हणजे एलिएन्स? व्हिडीओ पाहून लोकं म्हणतात…
कश्मीरमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर; १८०० पंडीत, ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कश्मीर सोडले
धनंजय महाडिक यांची माघार? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

आरोग्य इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट मनोरंजन

Join WhatsApp

Join Now