राज काय करत होता मला माहित नव्हतं! शिल्पा शेट्टीचं स्टेटमेंट ऐकताच शर्लीन चोप्राने साधला शिल्पावर निशाणा, म्हणाली दीदी…

मुंबई। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर हे प्रकरण सध्या गाजत असून सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. त्यांनतर या केसमध्ये आत्ता अनेक नवनवीन खळबळजनक असे खुलासे होतं असून प्रकरण आणखीणचं गंभीर होतं आहे.

या प्रकरणामध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडे आणि शर्लीन चोप्रा या अनेक खुलासे करत आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांना शिल्पाने दिलेलं स्टेटमेंट आता समोर आलं आहे. शिल्पाने म्हटलं आहे की, ती तिच्या कामात फारच व्यस्त होती त्यामुळे राज काय करत होता याची तिला कल्पना नव्हती.

राज काय करत होता याची तिला कल्पनाही नव्हती असं शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे. मात्र आता शिल्पाच्या या स्टेटमेंटवर शर्लीन चोप्रा हसली आहे व तिच्यावर निशाणा साधला आहे. शर्लीन चोप्राने एक व्हिडिओ बनवून तिने ‘येडा बनून पेढा खाणं’ अशा बोचऱ्या शब्दात शर्लीने शिल्पावर बोचरी टीका केली आहे.

एक व्हिडिओ शेअर करत शर्लिन म्हणाली आहे की शिल्पा दिदीला राज कुद्राच्या कामाबद्दल माहीत नव्हतं.
शिवाय, दीदी असेही म्हणतात की तिला तिच्या पतीच्या मालमत्तेच्या स्त्रोताची माहितीही नाही. आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे तुम्हाला माहितीच आहे असे ती म्हणाली आहे. त्यामुळे आता हा वाद अजून पेटण्याची शक्यता आहे.

जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावनी होणार आहे. 8 सप्टेंबरला राजच्या वकिलांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागीतली होती.

दरम्यान केसची तारीख असताना शिल्पा शेट्टी वैष्णो देवीच्या दर्शनाला गेली आहे. शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील सामग्री पुरवण्याचा होता.

तिचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. त्यामुळे ता हे प्रकरण नवीन वळण घेत असल्याचे समोर आपली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.