HomeUncategorizedमला माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे, करूणा मुंडेचा भाजपवर निशाणा

मला माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे, करूणा मुंडेचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची पहिली बायको करुणा मुंडे चांगलेच चर्चेत असतात. करुणा मुंडे वारंवार धनंजय मुंडे यांच्याविरोधातील व्हिडिओ टाकत असतात. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे आणि म्हंटले की, माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे.

करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, माझ्या पतीला मी सांगायचे की तुमच्यावर इतिहास रचला जाईल. पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पतीवर नाही तर माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे जिनं आपल्या पतीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री असणाऱ्या पतीने दोन मुलांची आई असणाऱ्या मला १६ दिवस तुरुंगात पाठवले.

तसेच, महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडया राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. असे करुणा मुंडे म्हणाल्या.

यावेळी, त्यांनी रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला. म्हणाल्या, आज राज्यात कोणतीही महिला सुरक्षित नाही. पूजा चव्हाण घ्या, दिशा सालीयन घ्या, माझे उदाहरण घ्या ,या महिलांसोबत राज्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिले आहे. आज महिलांसाठी कोणीच उभा राहत नाही. म्हणून मी मोठ्या हिमतीने वेगळा पक्ष काढला.

‘माझी घोषणा वेगळी आहे की कार्यकर्ता आगे बढो… करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे.’ मी आत्ता निवडणूक लढवण्याचा विचार केला नाही. मात्र जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढवेन. असे करुणा यांनी सांगितले.

यावेळी त्यानी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला की, मी व्यक्तीगत प्रकरणात काही भाष्य केलं नाही. ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी शांत आहे. मी माध्यमांना जाहीर न केलेल्या अनेक गोष्टी सांगणार आहे. पिक्चर अभी बाकी है… असे म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या
पुजारा-रहाणेमुळे युवा खेळाडूंना मिळेना संधी, संघातून हकालपट्टी करण्याची होतेय मागणी
होम लोनऐवजी भाड्याच्या घरात राहा आणि EMI च्या पैशांनी घ्या २-३ घरे, जाणून घ्या कसे
“दुकानांच्या पाट्याच नाही, पाट्यांच्या आतला दुकानदारपण मराठी माणूस होऊ शकेल असे काहीतरी करा”