”मला शाहरूखला पाहून खुप वाईट वाटते, आर्यन खानच्या चुकांची शिक्षा शाहरूखला का?”

मुंबई। क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले. आर्यनला 2 ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. व 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. आर्यनला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान प्रचंड प्रयत्न करत आहे.

मात्र दिवसेंदिवस आर्यन खानच्या कोठडीत वाढ होताना दिसत आहे. मात्र आर्यनची शिक्षा आर्यनच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागत आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे वडील शाहरुखच्या वयक्तिक व व्यावसायिक जीवनात याचा परिणाम होत आहे. दरम्यान अनेकजण आर्यनच्या प्रकरणावर शाहरुखवर टीका करत आहेत. तर अनेक जण शाहरुखला सपोर्ट करत आहेत.

यामध्ये बऱ्यापैकी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी शाहरुखला पाठींबा दिला आहे. दरम्यान आता अजून एका कलाकाराने शाहरुखसाठी आवाज उठवला आहे. जर आर्यन देखील ड्रग्स प्रकरणात आरोपी असेल तर यासाठी शाहरुखला त्रास देणे चुकीचे असल्याचे तो म्हणतो आहे.

अभिनेता, गायक अध्यायन सुमनने शाहरुखला पाठींबा दिला असून एका मुलाखतीत त्याने आपले विचार मांडले आहेत.’मी शाहरुखशी याआधीही बोललो आहे, वडिलांच्या दृष्टीकोनातूनही. त्याचे हृदय खरोखरच तुटले असावे. मला आत्ता आर्यनचा न्याय करायचा नाही.”

तो ड्रग्ज घेतो किंवा त्याच्याकडून काय सापडले आहे हे मला माहीत नाही. मी उत्तर देण्याच्या स्थितीत नाही. पण शाहरुख खान सारख्या पात्र व्यक्तीला तुरुंगात आपल्या मुलाची भेट घेणं पाहून मन हेलावलं असं अध्यायन म्हणाला आहे.

पुढे तो म्हणाला की, ‘जेव्हा लोक आधीच घसरत असतात, तेव्हा त्यांना खाली आणणे खूप सोपे असते आणि मला वाटते की काही लोक शाहरुखसोबत असेच करत आहेत. आर्यनने ड्रग्ज घेतले असले तरी शाहरुखला त्याचा फटका का सहन करावा लागतो हे मला समजत नाही. मी एका ट्विटद्वारे शाहरुखला थोडा पाठिंबा दिला होता.

मी त्याला पाठिंबा दिला आणि त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला, याचा अर्थ मी खटला चालवत होतो असे नाही. कायदा चालु द्या, पण शाहरुखला पाहून मला वाईट वाटते. शाहरुख खान तुरुंगात जात असल्याचे पाहून लाखो लोक दु:खी झाले आहेत. लवकरच सर्व काही ठीक होईल अशी माझी इच्छा आहे असं तो म्हणाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.