‘मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’ – उद्धव ठाकरे

मुंबई। राज्यात पावसाने रौद्ररूप धारण केलं आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण गावच्या गाव पाण्याखाली गेली आहेत. अशातच नागरिकांना एका मागोमाग अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत. मुसळधार कोसळलेल्या पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत.

त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले तीन ते चार दिवस कोकण दौऱ्यावर होते. अशातच आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या विषयावरील मुद्दे मांडले आहेत.

त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पुरग्रस्तांची परिस्थिती पाहता यावर कोणतही राजकारण करू नये. मी केंद्राकडे आपल्या राज्यासाठी मदत मागितली आहे. मात्र मी गुजरातप्रमाणे एवढे कोटी दया असं काहीही सांगितलेलं नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राकडून मदत मागितली जाईल. त्यामुळे उगाचच राजकारण करू नये.

तसेच त्यांनी बोलताना सांगितले की, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. काल (गुरूवारी) पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात ‘पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम तातडीने द्यावी,’अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मला नागरिकांच्या जीवाशी खेळ करायचा नाही, त्यांना जमेल त्या परीने लवकरात लवकर मदत कशी पोहचेल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यांच्या स्थलांतर, जमीन, शेती या सगळ्या गोष्टीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा पाहणी दौरा झाल्यावर मुंबईला परतल्यावर आम्ही बैठक घेणार आहोत व याच निमंत्रण विरोधीपक्ष नेत्यांना देखील देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच सकाळी कोल्हापुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील पाहणी पोहोचले असल्याचे समजले. त्यामुळे वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करण्यासाठी तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला व त्यांनी तो स्वीकारला यामध्ये कोणतही राजकारण नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल आहे.
महत्वाच्या बातम्या
काय सांगता! ‘या’ शेतकऱ्याने लावले शेतात सनी लिओनीचे पोस्टर, कारण ऐकून वाटेल नवल
चार्जिंगच नो टेन्शन! फक्त १० मिनिटांत फुल चार्ज होणार इलेक्ट्रिक कार, चार्ज केल्यावर चालणार १००० किमी
बाबो! प्रसिद्ध मॉडेलने केलं खळबळजनक विधान; म्हणाली पतीला सेक्स करण्यास कधी मनाई करू नये नाहीतर…
मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेणारे शिवसेनेचे पदाधिकारी? मनसेने दिला चोप, बांदेकरांनी दिले उत्तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.