एबी डिव्हिलियर्सने जिंकली भारतीयांची मने; म्हणाला, मला याचा अभिमान आहे की मी अर्धा भारतीय

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक, दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यासोबतच ३७ वर्षीय डिव्हिलियर्सने आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत ब्रेकअप केले. डिव्हिलियर्सने 2011 मध्ये आरसीबीकडून खेळण्यास सुरुवात केली आणि त्याने 11 हंगाम खेळले आहेत.

त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी 156 सामन्यात 4491 धावा केल्या. आरसीबीसाठी तो कोहलीनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तो म्हणाला, मी आरसीबीकडून बराच काळ खेळलो. नुकतीच 11 वर्षे झाली आणि आता संघ सोडणे हा खट्टा मिट्ठा अनुभव आहे.

हा निर्णय मी खुप उशीरा घेतला पण माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते यांचे आभार मानू इच्छितो. आरसीबी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल आणि आम्ही या संघाला नेहमी प्रोत्साहन देऊ.

एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, मी आयुष्यभर आरसीबियन राहणार आहे. आरसीबीच्या सेटअपमध्ये प्रत्येकजण माझ्यासाठी एक कुटुंब बनला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

३७ वर्षीय एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीने 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या ज्यात तीन शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात त्याने 6 डावात 51.75 च्या सरासरीने 207 धावा केल्या.

यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लेगमध्ये एबीला कोणताही प्रभाव सोडता आला नाही. डीव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आरसीबीनेही ट्विट केले, एका युगाचा अंत! तुझ्यासारखा कोणी नाही, एबी… आरसीबीमध्ये आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तु संघाला, चाहत्यांना आणि सर्वसाधारणपणे क्रिकेटप्रेमींना जे काही दिले त्याबद्दल तुझे आभार… निवृत्तीच्या शुभेच्छा, लिजेंड!

दरम्यान, एबीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरसीबीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता आपला आवडता खेळाडू आपल्याला आयपीएलमध्ये दिसणार नाही या कारणामुळे चाहते निराश झाले आहेत. अनेक चाहते फक्त त्याचा ३६० डिग्री फलंदाजी पाहण्यासाठी सामना पाहायचे. आता एबीची ३६० डिग्री फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार नाही हे निराशाजनक आहे.

महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय लज्जास्पद; आता मोदींवरच भडकली कंगना
अख्ख तिरुपती शहर पाण्याखाली, ५० वर्षांत पहिल्यांदाच भयावह पूर परिस्थिती; व्हिडिओ आला समोर
मरण्याआधी ‘ही’ गोष्ट करतो माणूस; अनेक मृत्यू पाहीलेल्या नर्सच्या खुलाश्याने उडाली खळबळ
‘’आमदारकीची हळद लावून बसलोय, पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही’’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.