Share

Prakash Mahajan MNS Resignation: मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजनांनी मनातलं सगळंच सांगितलं

Prakash Mahajan MNS Resignation:  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)चे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पक्षातल्या अस्वस्थतेनंतर आज अधिकृतपणे राजीनामा दिला. महाजन म्हणाले की, त्यांना कुठल्याही पदाची किंवा निवडणूक तिकिटाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार योग्यरित्या जोपासला जावा ही त्यांची एकच अपेक्षा होती. मात्र पक्षाच्या निर्णयांमुळे आणि वैयक्तिक उपेक्षेमुळे त्यांचा मनसा सोडण्याचा निर्णय झाला.

“मला विधानसभेत प्रचारापुरते वापरलं गेलं. मी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा थोडासा अपराधी आहे कारण मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत काम करेन. मला असंख्य लोकांनी प्रेम दिलं, त्यांचा मी ऋणी राहीन. पण आता मला थांबावे लागले आहे. माझ्या वाट्याला उपेक्षा मिळाली, हीच खरी गोष्ट आहे,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

महाजन यांनी 24 जून 2025 रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवरही भाष्य केले होते. ते म्हणाले, “युती न झाल्यास मराठी माणूस राज ठाकरें (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांना कधीच माफ करणार नाही. ही एक चूक इतिहासात काळ्या अक्षरात राहील.” तसेच भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याशी झालेल्या वादामुळे पक्षातील दबाव आणि अस्वस्थता वाढल्याची त्यांनी नोंद केली.

महाजनांचे बोलणे आणि मीडिया वावर यामुळे त्यांना पक्षात एकटेपणा जाणवला. त्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी महाजनांना मुंबईत बोलावून समजूत काढली, परंतु त्यावेळी राज ठाकरें यांची भेट घेता आलेली नाही.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now