गुड न्युज! फक्त ४ लाखात ह्युंदाईची नवी कोरी अलिशान SUV कार मिळणार; जाणून घ्या फिचर्स

देशात लवकरच आता हुंडाईची सर्वात स्वस्त SUV येणार आहे. त्यासाठी ह्युंदाई आता तयारीलाही लागली आहे. निस्सान मॅग्नाईट, रेनॉच्या, किगरसह सोबतच मारुतीला टक्कर देण्यासाठी ह्युंदाई एक हॅचबॅक लाँच करणार आहे.

सध्या कंपनीने या कारचे डिझाईन तयार केले आहे. तसेच या कारला जगभरातील रस्त्यांवर अनेकदा पाहिले गेले. ह्युंदाईने या कारला एक्स वन असे नाव दिले आहे. ही एक मायक्रो SUV असणार आहे.

सध्या जगभरात कारचे वेगवेगळे व्हेरियंट दिसत आहे. तसेच या कारच्या डिझाईनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सर्वात स्वस्त SUV असल्याने सगळ्यांचेच लक्ष या कारकडे लागलेले आहे.

मारुतीकडे सध्या मस्क्युलर लुकमध्ये एसप्रो ही कार आहे. या कार अनेक लोकांनी पसंत केली आहे. तर दुसऱ्या कंपन्यांकडे पाच लाखांपासून सुरु होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV आहेत.

अशात ह्युंदाईकडे एक हॅचबॅक कार आहे. आता ह्युंदाईला छोट्या मसक्युलर कारची गरज पडत आहे. त्यामुळे आता ह्युंदाईने AX1 Micro SUV चे एखाद्या SUV प्रमाणे डिझाईन केले आहे.

काही फोटोंमध्ये ही कार वेगळी दिसून येत आहे. या कारमध्ये एलईडी टेल लॅम्पला नेहमीचा लुक देण्यात आला आहे. मात्र या कारला टर्न इंडिकेटर गोलाकार देण्यात आले आहे. जे बंपरवर असणार आहे.

तसेच या कारमध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये १.१ लीटर आणि १.२ लीटरचे इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन ८३ आणि ११३ पी एस एनएमचा पीक टोर्क उत्पन्न करणार आहे. दोन्ही इंजिनांना ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्स दिला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
पायाने घालतो डोक्यावर टोपी, पोट चाकासारखं गोल फिरवतो; पाहा रामदेव बाबाला टक्कर देणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ
सासरे वारलेत, घरी कोणच नाही, प्लिज अंत्यसंस्कार करा; लेफ्टनंट कर्नलचा कश्मीरमधून पोलीसांना फोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.