मोठी ऑफर! ‘या’ नामांकित कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर दीड लाखांपर्यंतचा डिस्काऊंट

मुंबई | इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय ह्युंदाई इंडिया ही कंपनी तिच्या निवडक कारवर बंपर डिस्काऊंट ऑफर देत आहे. ही ऑफर ग्राहकांसाठी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहकांना कारवर तब्बल १.५ लाखांपर्यंत सूट मिळणार आहे.

अलिकडे भारतातील लोकांचा इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढला आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षक डिझाईन, नामांकित कंपन्या आणि  डिस्काऊंटमुळे लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत. तसेच इंधनाच्या वाढत्या किंमती यामुळे ग्राहकांनी पेट्रोल-डिझेल वाहनांकडे पाठ फिरवली आहे.

अशात ह्युंदाई इंडिया या प्रसिद्ध कंपनीने तिच्या निवडक कारवर डिस्काऊंट देत आहे. ह्युंदाईने यामध्ये सँट्रो, ऑरा, ग्रँड i10 Nios, एलेंट्रा आणि कोना या गाड्यांचा समावेश केला आहे. ह्युंदायच्या कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर १.५ लाखांची सूट ग्राहकांना मिळणार आहे.

ह्युंदायच्या वाहनांवर दिली जाणारी ऑफर डीलर टू डीलर वेगळी असू शकते. परंतु ह्युंदाईने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सँट्रो या करावर ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये ३० हजार रुपयांची रोख सवलत, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५००० रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देला जाणार आहे.

तसेच, एलेन्ट्रा या कारवर १ लाख रुपयांपर्यंत सवलत दिली आहे. यात ७० हजारांचा रोख डिस्काऊंट, ३००० रुपयांपर्यंतची बोनस ऑफर देण्यात येत आहे. तसेच ह्युंदाई ऑरा कारवर ७० हजारांपर्यंतची सूट दिली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकारकडून मिळणार तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त अनुदान
पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  
“पैशांसाठी आयपीएल स्पर्धेत खेळण्यापेक्षा मी देशासाठी खेळणे पसंत करीन”
याला म्हणतात ईमानदारी! कुत्र्याने पाण्यात उडी मारून वाचवला चिमुकलीचा जीव, पहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.