कार घ्यायची आहे? बाईकच्या किंमतीत खरेदी करा ह्युंदाईची ‘ह्या’ शानदार कार्स

आजच्या काळात कार खरेदी करायची म्हणलं की दहा वेळा विचार करायला लागतो. कारण कार खरेदी करायची म्हणजे आपण जमा केलेली सगळी रक्कम मोजावी लागते. सामान्य माणसाला चांगली कार खरेदी करणे सोपे नसते. पण आज आम्ही तुम्हाला बुलेटच्या किमतीत विकल्या जाणाऱ्या कारबद्दल सांगणार आहोत.

सध्या सेकंड हॅन्ड गाड्यांकडे लोकांचा कल वाढत आहे. लोक सार्वजनिक वाहतुकीपासून अंतर ठेवत आहेत. यामुळे सेकंड हॅन्ड गाड्यांचा व्यापार वाढला आहे. त्यातल्या त्यात ह्युंदाईच्या गाड्या लोकांना खूप आवडतात पण त्या गाड्या खूप महाग आहेत त्यामुळे त्या परवडत नाहीत.

त्यासाठी ह्युंदाईने एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एचप्रॉमिस ह्युंदाई हा उत्तम पर्याय आहे. या वेबसाईटवर आपण आपल्या शहरातून घरबसल्या कार निवडू शकता. आपण आपली जुनी ह्युंदाई कार येथे विकू शकता आणि ज्यांना कार हवी आहे त्यांना एकदम आवडत्या किमतीत कार मिळेल याची खात्री ह्युंदाईने दिली आहे.

देशातील बऱ्याच कंपन्या आपल्या सेकंड हॅन्ड कंपनीच्या गाड्या विकतात. बऱ्याच कंपन्यांचे सेकंड हॅन्ड कारचे शोरूमसुद्धा आहे. तुम्हाला वाचून आनंद होईल की, सेकंड हॅन्ड कारवरसुद्धा तुम्हाला वॉरंटी मिळते. एचप्रॉमिस ह्युंदाई त्यांच्या सर्टिफाईड कारवर एक वर्षांची वॉरंटी आणि २ फ्री सर्व्हिस देत आहे.

जर तुम्हालाही स्वस्त आणि मस्त गाडी खरेदी करायची आहे तर Hpromise.hyundai च्या वेबसाईटवर जा. येथे कार खरेदी करा व डावीकडील फिल्टरवर क्लिक करून आपणांस शहर, बजेट, श्रेणी आणि कारचा रंग निवडता येईल. त्यामुळे तुम्हाला देशभरातील शोरूमबद्दल माहिती मिळेल. मग आपल्या आवडीची गाडी निवडा.

कार खरेदी करायची असेल तर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती बघायची असेल तर  https://hpromise.hyundai.co.in वेबसाईटवर जा. तुम्हाला हवी असलेली ह्युंदाईची कार तुम्हाला तिथे मिळेल. या वेबसाईटवर ह्युंडाईची EON, CRETA, XCENT, SANTAFE, i20, i10, या सर्व गाड्या खूप स्वस्तात उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काय होतीस तू? काय झालीस तू? रानू मंडलला उद्धटपणा भोवला, आता झाली ‘अशी’ अवस्था

पूर्ण महाराष्ट्राला कोरोनाचा धोका; १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू सारखी भयंकर लाट येणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.