धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव नाही छापले म्हणून झाला वाद; मंडपातच पडला रक्ताचा सडा

लग्नामध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरुन वाद होत असतात. काहीवेळा वादातून अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. आता अशीच धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. फक्त लग्न पत्रिकेत नाव नसल्याने मंडपात रक्ताचा सडा पडल्याची घटना घडली आहे.

लग्नपत्रिकेत नाव नसल्यामुळे अनेकदा रुसवे फुगवे होत असतात. पण हैद्राबादच्या तुकारामगेट परीसरात नाव नसल्याच्या कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली आहे. तसेच यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले आहे.

तुकारामगेट परीसरात आझाद चंद्रशेखरनगरमध्ये इलेट्रीशय म्हणून काम करणारे शेखर आणि सर्वेश या दोन तरुणांनी हे कृत्य केले आहे. लग्नपत्रिकेत सर्व जेष्ठांची नावे होती, पण शेखर आणि सर्वेश यांच्या आईवडिलांची नावे नव्हती. त्याचा राग दोघांच्या मनात होता.

त्याच कारणावरुन यादगिरी नावाच्या एका नातेवाईकाशी त्यांच भांडण झाले. या दोघेही आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आमच्या आईवडिलांची नावे छापली गेली नाही, असा आरोप केला आहे. त्याच वादातुन ही धक्कादायक घटना घडली आहे.

हा वाद मिटवण्यासाठी यादगिरी यांच्यासह प्रवीण, परशुराम आणि प्रताप हे शेखरच्या घरी गेले होते. त्यावेळी त्या दोन्ही आरोपींनी यादगिरीच्या पत्नीशी असभ्य भाषेत बोलत होते. मग या दोन गटांमध्ये भांडण झाले, त्यावेळी शेखरने त्या आलेल्या लोकांवर चाकू हल्ला केला.

यावेळी यादगिरी आणि प्रताप यांना किरकोळ झखमा झाल्या, तर प्रवीणच्या पोटात आणि परशुरामच्या छातीत त्यांनी आरोपींनी चाकू खुपसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेनंतर आता त्यांनी प्रकृती स्थिर आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

गृहप्रवेशाआधीच घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात
काय सांगता! हिऱ्याच्या शोधात गावकऱ्यांनी खोदला डोंगर, आणि …
सलमान खानला अभिनेता नाही तर क्रिकेटर बनवणार होते सलीम खान पण….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.