Share

‘मनी हाईस्ट’ पाहून अपहरण करायचा ऑटोचालक, पोलिसांनी केली अटक

hyderbaad-news.j

नेटफ्लिक्सवरील(Netflix) स्पॅनिश क्राईम ड्रामा ‘मनी हाईस्ट'(Money Heist) ही मालिका जगभरात खूप लोकप्रिय आहे. या मालिकेपासून प्रेरित होऊन एका ऑटो चालकाने(Auto Driver) पाच लोकांची टोळी तयार केली. ही टोळी खंडणीसाठी लोकांचे अपहरण करायची. हैदराबाद पोलिसांनी लोकांचे अपहरण करणाऱ्या या टोळीला अटक केली आहे. ‘मनी हाईस्ट’ ही मालिका नेटफ्लिक्सवरील सर्वात जास्त वेळा पाहिली गेलेली वेबसिरीज आहे.(hyderbaad auto driver watch money heist and kidnapped people)

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गुंजापोगु सुरेश असे आहे. सुरेश हा ‘मनी हाईस्ट’ या वेबसिरीजचा चाहता आहे. सुरेशने ‘मनी हाईस्ट’ या मालिकेपासून प्रेरणा घेऊन एक टोळी तयार केली. या टोळीमध्ये पाच जण सुरेश सोबत होते. या टोळीने अनेक लोकांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे पैशांची मागणी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

या टोळीने महिलांसह काही निरपराध लोकांचे अपहरण केले आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावून त्यांच्याकडून पैसे कमावले. या टोळीने लोकांसोबत सवांद साधण्यासाठी सोशल मेसेंजिंग अँपचा वापर केला आणि लोकांचा विश्वास संपादन केला. ही टोळी लोकांना व्हॉइस मेसेज आणि टेक्स्ट मेसेज पाठवून त्यांच्याशी सवांद साधायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हाच ऑटोचालक अपहरणाच्या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. या प्रकरणात आणखी चार जण आणि एका महिलेचाही समावेश आहे. ऑटोचालक सोडून इतर आरोपी फरार आहेत.

हैदराबादच्या पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी सांगितले की, आरोपी सुरेशने स्वतःच्या ओळखीच्या लोकांना लक्ष्य करत त्यांच्या किशोरवयीन मुलांचे अपहरण करण्यास सुरुवात केली. त्याने गुडीमलकापूर येथील १९ वर्षीय प्रशांतचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून ५० हजार रुपयांची मागणी केली.

महत्वाची बाब म्हणजे ऑटोचालकाने स्वतःचे नाव प्रोफेसर असे ठेवले होते. या नावाच्या पात्राने ‘मनी हाईस्ट’ या शोमध्ये मुख्य भूमिका केली होती. या प्रकरणात ऑटोचालक व त्याच्या टोळीने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तर अन्य काही प्रकरणात त्यांनी यापेक्षा जास्त पैशांची मागणी केली होती. या प्रकरणाची सध्या हैदराबाद शहरात चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :-
इतक्या भीषण अपघातातून कसंकाय वाचली अभिनेता दीप सिद्धूची गर्लफ्रेंड? वाचा थरारक अनुभव
‘संजय राऊत दरवर्षी माझ्या घरी येतात’, ‘तो’ फोटो शेअर करत मोहित कंबोज यांनी राऊतांना पाडले तोंडघशी
विराटबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला रोहित शर्मा, म्हणाला, ”तुम्ही मिडीयावाले गप्प बसलात तर बरं होईल”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now