मधूचंद्राच्या दिवशीच ताप आला अन् नवरदेवाचा झाला मृत्यु; नवरीचा संसार झाला काही तासातच उध्वस्त

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे हजारो रुग्णांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे आता रोज अनेक कुटुंब उधवस्त होत आहे.

आता अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये घडली आहे. लग्न झालेल्या मुलीवर दोनच दिवसांत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्न झाल्यानंतर फक्त दोनच दिवसात नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

ज्या दिवशी लग्न झाले होते, त्याच दिवशी नवरदेवाला ताप आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. तसेच त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण उपचारादरम्यानच तरुणाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

बिजनौर शहरात राहणाऱ्या अर्जूनचे लग्न चांदपुरमध्ये राहणाऱ्या बबलीशी २५ एप्रिलला लग्न केले होते. २५ तारखेला दोघांचेही लग्न धुमधडाक्यात झाले होते. त्याच दिवशी ते घरी आले तेव्हा रात्री अर्जूनला अचानक ताप आला आणि तो ताप वाढतच चालला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात अर्जूनची कोरोनाची टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर २९ एप्रिलला त्याचा कोरोनामुळे मृत्यु झाला.

नवऱ्याच्या मृत्युची बातमी मिळताच नवरी मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर साथ देण्याचे स्वप्न काही तासातच संपले आहे. आयुष्यभर साथ देणारा नवरा काही तासातच गमावल्यामुळे नवरी मुलीला मानसिक धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंडियन आयडलमध्ये बापाविना दिसणार सायली कांबळे, तिने सांगीतलेले कारण ऐकून तुम्हालाही येईल रडू
मोठी बातमी! अहमदनगरमध्ये बॉम्बस्फोट
लग्नाच्या दिवशी नवरीला आला नवरदेवाचा मॅसेज; मॅसेज वाचून नवरीचे अख्खे कुटुंबच हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.