नवरा बायकोची भन्नाट आयडीया, एकमेकांचे कपडे वापरून केली ७७ हजारांची बचत

घर चालवण्याची प्रत्येक जोडप्याची स्वतःची वेगळी पद्धत असते. काहींना किंग साइज आयुष्य जगायचे आहे, तर काहींना त्यांच्या भविष्यासाठी अधिकाधिक बचत करायची आहे. 34 वर्षीय ग्रेस सर्गीने तिचा पती रायन केनवर्डसह कमी तणाव आणि अधिक बचतीसह जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी ती काही अपारंपरिक पद्धतींचा वापर करत आहे. 34 वर्षीय डिजिटल डिलिव्हरी मॅनेजर ग्रेसने कुशल गृहिणीप्रमाणे पैसे वाचवण्याचा उत्तम मार्ग शोधला आहे. नवरा-बायकोचे वॉर्डरोब वेगळे नसावेत अशी कल्पना सामान्यतः लोक करू शकत नाहीत.

पण ग्रेसला एवढी छान कल्पना सुचली की रोज खरेदीचा त्रास होत नाही आणि एका झटक्यात तिने ७७ हजार रुपये वाचवले आहेत. ग्रेस खुप जुगाडू आहे आणि कमी किमतीत टिकाऊ वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देते. अशा परिस्थितीत पती-पत्नीने हिवाळ्यातील वॉर्डरोबवर लाखोंचा खर्च करावा असे तिला वाटत नव्हते.

या कारणामुळे तिने पती रायन आणि स्वतःसाठी वेगळे कपडे खरेदी केले नाहीत. तिने काही कपडे विकत घेतले, जे तिचा नवरा घालू शकतो आणि ती स्वत:ही घालू शकते. Lovethesales.com च्या वृत्तानुसार, या जोडप्याने विंटर शॉपिंगमध्ये बचत केली आणि भारतीय चलनानुसार 77 हजार रुपये वाचवले.

कपड्यांव्यतिरिक्त ती गॉगल, बेल्ट आणि शूजसह अनेक वस्तू देखील कॅरी करते ज्या त्या दोघांनाही वापरता येतात. बॉयफ्रेंड फिट जीन्स आणि बॅगी जंपर्स ही या जोडप्याची पहिली पसंती आहे. कपडे शोधण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात पण त्यांची शॉपिंग पैसा वसूल असते. ज्या कपड्यांची किंमत जास्त आहे, ते 50 टक्के सूट देऊन खरेदी करतात.

ते म्हणतात की अनेक ब्रँड्स त्यांच्या कपड्यांवर युनिसेक्स टॅग लावत नाहीत, परंतु ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करू शकतात. असं असलं तरी, जर जोडीदारांची उंची समान असेल तर त्यांना एकमेकांचे कपडे घालण्यास फारशी अडचण येत नाही आणि त्यामुळे पैशांचीही बचत होते.

महत्वाच्या बातम्या
‘’आमदारकीची हळद लावून बसलोय, पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही’’
मोदींचा मास्टरस्ट्रोक: एका झटक्यात विरोधकांचे डावपेच केले नष्ट, निवडणुकीत होणार ‘हा’ फायदा
‘सुर्यवंशी’ चित्रपटावर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली, चांगल दाखवता येत नसेल तर..
..तरच खड्ड्यातून बाहेर येईल, सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर परमबीर सिंगांचे उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.