प्रेरणादायी! भाडेतत्वावर शेती घेऊन हा शेतकरी कमावतोय लाखो रूपये, वाचून अवाक व्हाल

जामखेड हा तसा दुष्काळी भाग असलेला तालुका. येथील गावांना नेहमीच पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक गाव म्हणजे धोंडपारगाव. येथील एका शेतकऱ्याची आज आम्ही तुम्हाला प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

संतोष मोहनराव पवार यांनी ऍग्री व इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४० एकर शेती होती. पण दुष्काळी भाग असल्यामुळे त्यांना शेती करताना खुप अडचणी येत होत्या. यानंतर त्यांनी विविध कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिकलची कामे घ्यायला सुरूवात केली.

त्यात त्यांना चांगली कमाई होऊ लागली. नगर, पुणे, औरंगाबाद येथे कामे सुरू असताना ते गावाकडून नगर शहरात कामासाठी येऊ लागले. त्यांनी काही काळानंतर ऑरगॅनिक हॉटेल तयार केले. त्यात सेंद्रिय शेती करण्यास सुरूवात केली.

तसेच ५० गीर गाईंचे संगोपन करून सुमारे १२५ लिटर दुधातून कमाई करण्यास सुरूवात केली. व्यवसाय चांगला सुरू होता पण त्यांना मातीची खुप ओढ होती. त्यांच्या वडिलांनी धोंड पारगाव या त्यांच्या मुळ गावात १२ एच एफ गाईंचे संगोपन करून दुधाचा व्यवसाय सुरू केला होता.

यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनीही देशी गीर गाईंचे संगोपन करण्यास सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी गुजरातवरून ६ देशी गीर गाई आणल्या. या गाईंमध्ये वाढ होत गेली आणि आता त्यांच्याकडेज ५० गाई आहेत.

दिवसाला १०० ते १२५ लिटर दुध उत्पादन त्यांना मिळते. पण त्यांच्यासाठी चाराही महत्वाचा आहे. त्यासाठी त्यांनी भाडेतत्वावर शेती घेतली आहे. चाऱ्यासाठी या शेतीचा उपयोग केला जातो.

त्यांनी २५ एकर शेती भाडेतत्वावर घेतली आहे. त्यात टॉमेटो, वांगी, कारले, दोडके, गवार, भेंडी, काकडी, पालक या पिकांची शेती ते सेंद्रिय पद्धतीने करतात. यातच १५ एकरमध्ये ते चाऱ्याचे उत्पादन घेतात. शेतीसाठी ते फक्त शेणखत आणि गोमुत्र वापरतात.

त्यांनी माती आणि पाणी तपासणी केंद्रही सुरू केले आहे. माफक दरात ते ही सेवा शेतकऱ्यांना पुरवतात. त्यांची स्वताची रोपवाटिकासुद्धा आहे. पुणे येथील कृषी महाविद्यालयातील प्रियांका सोपान घुले या विद्यार्थीनीने केलेल्या रीसर्चमध्ये पवार यांची प्रेरणादायी कथा समोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.