Share

धक्कादायक! पत्नी झोपेत असताना शेजारी झोपलेल्या पतीचा झाला खून, पोलिसांनी पत्नीलाच घेतलं ताब्यात

crime

भरतपूरमध्ये(Bharatpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत झोपलेल्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. सकाळी उठल्यानंतर पत्नीला पतीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत चौकशी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.(Husband murdered by sleeping neighbor while wife was sleeping)

ही घटना भरतपूर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील बेरू गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयाच्या आधारे मृत व्यक्तीच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सध्या मृताच्या पत्नीची चौकशी करत आहेत. मृत व्यक्तीच्या पत्नीने अडीच वर्षांपूर्वी पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जितेंद्र सैनी असं आहे. तर मृत व्यक्तीच्या पत्नीचे नाव दीपा असं आहे. जितेंद्र आणि दीपा भाड्याच्या घरात राहत होते. जितेंद्रचे फळांचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा पती-पत्नी दोघेही घरी आले होते. रात्रीचे जेवण करून दोघेही एकाच खोलीत झोपले. जितेंद्र पलंगावर झोपला होता, तर पत्नी दीपा खाली झोपली होती.

सकाळी पत्नीने डोळे उघडले तेव्हा जितेंद्रचा मृतदेह पलंगावर रक्ताने माखलेला अवस्थेत पडला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात जितेंद्रचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याच्यावर चाकूने देखील हल्ला करण्यात आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे जितेंद्रची पत्नी दीपाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि दीपा यांचा १२ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. अडीच वर्षांपूर्वी दीपाने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मयत जितेंद्र आणि त्याचा भाऊ बिजेंद्र हे सहा महिने तुरुंगात होते. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशामध्ये एका पत्नीने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली होती. पत्नीने आणि तिच्या प्रियकराने धारधार शस्त्राने पतीची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्रातही अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश करणार का? शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगीतलं..; म्हणाले..
आमिर खान माझं पहीलं प्रेम होता, मी त्याला माझे फोटो आणि प्रेमपत्र पाठवायची; अभिनेत्रीचा खुलासा
नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now