पत्नी वेळ देत नाही म्हणून तिच्या वागण्यावर पतीला आला संशय; घरात कॅमेरा बसल्यावर समोर आले ‘हे’ कारण

लॉस एंजेलिस | नवराबायकोच्या नात्यामध्ये विश्वास खुप महत्वाचा असतो. पती घराबाहेर पडून कष्ट करून पै पै कमावतो. तर पत्नी घरातील कामे, मुलाबाळांना सांभाळते. बऱ्याच वेळेस घरात काही कारणांवरून वादाला सुरूवात होते.

पती पत्नीच्या पवित्र नात्यामध्ये दुरावा येण्यास सुरूवात होते. त्यानंतर पतीपत्नीच्या वादाला गंभीर वळण लागतं आणि धक्कादायक घटना घडते. लॉस एंजिलिसमध्ये अशीच एक घटना घडली आहे. मात्र पतीला त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

अमेरिकेच्या लॉस एंजिलेस शहरामध्ये मेलानिया दारनेल पती आणि लहान मुलांसोबत राहते. मेलानियाचा पती तिच्यावर खुप प्रेम करत असे. मेलानियाही पतीवर जिवापाड प्रेम करायची. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता.

मेलानियाचा पती ट्रॅव्हलिंगमध्ये नोकरी करत होता. त्यामुळे जास्त वेळ तो घराबाहेरच असायचा. घरी परतल्यानंतर आपल्या पत्नीला मुलाबाळांना वेळ देत होता. मात्र काही दिवसाने पती घरी आल्यानंतर मेलानिया त्याला वेळ देत नव्हती.

खुप दिवसांनी घरी गेल्यानंतर मेलानिया आपल्याला वेळ देत नाही. जास्त बोलत नाही. नेहमी अस्वस्थ शांत थकलेली असायची. त्यामुळे तिचा पती चांगलाच संतापला होता. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे सवाल यायचे.

मेलानिया आपल्याला का वेळ देत नाही. तिचे कुणाबरोबर प्रेमसंबंध तर नाहीत ना? का आजून दुसरे काही कारण आहे. असे अनेक सवाल पतीला सतावत होते. त्यानंतर त्याने मेलानिया अशी का करत आहे हे जाणून घ्यायचं ठरवलं.

मेलानियाच्या पतीने तिच्या  खोलीत गुपचुप एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. त्यानंतर मेलानियाच्या प्रत्येक हालचालीवर तिचा पती लक्ष ठेऊ लागला. अखेर पतीला मेलानिया असं का करत आहे. याचं खरं कारण समजलं.

मेलानियाही आपल्या छोट्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. मुलं रात्री झोपताना मेलानियाला त्रास देत होती. मुलांमुळे तिला नेहमी उठून बसावं लागत होतं. त्यामुळे मुलांना झोपवल्यानंतर मेलानिया झोपी जायची आणि सकाळी लवकर उठून बाकीची कामे देखील करायची असतात.

त्यामुळे मेलानिया नेहमी थकलेली, शांत, अस्वस्थ असायची असं पतीला समजलं. पतीने सीसीटीव्ही  पाहिल्यानंतर आपल्याकडून खुप मोठी चुक झाली आहे. आपण पत्नीवर संशय घेतला आहे. यामुळे त्याला खुप पश्चाताप झाला. त्यानंतर त्याने पत्नीची माफी मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाणे शरीरासाठी ठरतय घातक; वाचा तज्ञ काय म्हणतात..
दोन वर्षांपासून BCCI ने थकवले पैसे; कोरोनाग्रस्त भावाच्या उपचारासाठी क्रिकेटपटू झालाय हतबल
कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा; वृद्धावर सायकलवरून मृतदेह नेण्याची आली वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.