धक्कादायक! पतीचा कोरोनाने मृत्यू, पत्नीने दोन मुलांसह घेतले विष; क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

देशात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत. कोरोनामुळे सध्या रोज धक्कादायक घटना समोर येत आहेत.अशीच एक धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीने आपल्या दोन मुलांसह विष घेऊन आत्महत्या केली.

यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. जयेशभाई जैन हे नाश्त्याचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ते पत्नी साधनाबेन जैन आणि कमलेश व दुर्गेश यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. ते द्वारकेत राहत होते.

जयेशभाई जैन यांचे शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी अंत्यसंस्कार करून आल्यानंतर तिघांनीही विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली.

घरातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाने निधन झाल्याने तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होत आहेत.

त्यांच्या घरी रोज दूध टाकणारा जेव्हा आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडा असल्याचे दूधवाल्याच्या निदर्शनास आले. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

जयेशभाई हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना हा धक्का सहन झाला नाही. यामुळे तिघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

ताज्या बातम्या

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या बॉडीला स्पर्श केल्याने आपल्याला कोरोना होतो का? डॉक्टर म्हणतात…

माझं पुर्ण कुटुंब कोरोना पाॅझीटीव्ह, प्लिज आमच्यासाठी प्रार्थना करा; शिल्पा शेट्टीची आर्त हाक

“संसदेसाठी, पुतळ्यांसाठी २० हजार कोटी, मग लसीकरणाला ३० हजार कोटी का नाहीत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.