पतीची तब्येत अचानक खालावली, डॉक्टर पत्नीने AC मधून ऑक्सिजन देत पतीचे प्राण वाचवले

पुणे । राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. मात्र घरीच घरीच होमक्वारंटाइन असलेल्या व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना ऑक्सिजन मिळवणे कठीण झाले आहे.

अशातच पुण्यामध्ये एका पतीची ऑक्सिजन पातळी कमी झाली. त्यामुळे डॉक्टर असलेल्या पत्नीने एसीच्या हवेच्या दाबाने ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन लेव्हल कायम ठेऊन बरे करण्याचा कौतुकास्पद प्रयोग यशस्वी केला आहे. AC चा ऑक्सिजन सारखा वापर करून सुहास राव यांचा कमी झालेला ऑक्सिजन वाढवला आहे.

डॉक्टर दीपिका राव असे या डॉक्टरांचे नाव आहे. पती सुहास राव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना रात्री अचानक श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यांची ऑक्सिजनची पातळी ८७ पर्यंतखाली आल्याचे पत्नीच्या लक्षात आले.

रात्र झाल्याने ते कुठे जाऊ शकत नव्हते, त्यामुळे दीपिका यांनी तातडीने निर्णय घेत घरातला एसीचा ब्लोअर सुहास यांच्या तोंडासमोर आणला आणि एसीचे हवा त्याला शरीरात सोडली. यानंतर त्यांना बरे वाटू लागले आणि ऑक्सीजन लेव्हल ९२ वर येऊन पोहोचली.

एसीच्या थंड हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दाबाने येणारे हवा रुग्णाच्या शरीरात जाऊन त्याच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते.

यामुळे सुहास राव यांचे प्राण वाचले. त्या म्हणाल्या, गाडीतून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना सुद्धा ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास गाडीच्या एसीच्या मदतीने रुग्णाला स्टेबल ठेवता येऊ शकते.

ताज्या बातम्या

जामनेरचा आमदार कुठे मेला.?, गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो; खडसेंच्या क्लिपने राज्यात खळबळ

‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर ऐवजी दिसले असते रजनीकांत; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार

बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.