२५ लोकांची खिंड एकट्या नवरदेवाने लढवली, पुर्ण मंडपात एकटाच वेड्यासारखा नाचला, पहा व्हिडीओ

कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प झाले आहे. पुर्ण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे त्यामुळे अनेक निर्बँध लावण्यात आले आहेत. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच लग्नसमारंभांनाही २५ लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

तसेच लग्नाला दोन तासांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पण जरी लग्नसमारंभाना मर्यादा घालून देण्यात आल्या असल्या तरी अनेक लोकांनी लॉकडाऊनमध्ये लग्न उरकून घेतले आहे. त्यामध्ये अनेकांनी कोरोनाचे नियम मोडल्याने त्यांना हजारो रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तुम्ही अशा अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहिल्या असतील की ज्यामध्ये कोरोनाकाळात अनोख्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये नवरदेव अंधाधुंद होऊन नाचत आहेत.

लग्नामध्ये कोणच नव्हतं म्हणून नवरदेवाने सगळ्या लोकांची कमी भरून काढली आहे. लग्नाला २५ जणांची परवानगी असल्याने नवऱ्याला लोड आला आहे आणि तो जोराजोरात उड्या मारत असताना नाचत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे.

नवरदेवाचा डान्स पाहून अनेकांना आपले हसू आवरत नाहीये. पुर्ण मंडपात नवरदेव एकटाच नाचताना दिसत आहे. फेसबूकला एकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहीले आहे की २५ जणांची खिंड एकट्याने लढवली. पण नक्की नवऱ्याला आनंद कोणत्या गोष्टीचा झाला आहे हे कळणे अवघड आहे.

दरम्यान, कोरोनामध्येही असे बरेच लोक ज्यांनी लग्न उरकून टाकले. त्यातल्या त्यात काहींना आनंद होता की लग्नाचा मोठा खर्च वाचला. कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. त्यामुळे बरेच लोक कोरोनाकाळात लग्न उरकून घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या
केंद्राने डोस कमी दिले असले तरी राज्य लसीकरणात पहिल्या नंबरवर, जाणून घ्या आकडेवारी
पंढरपुरच्या निवडणूकीचे हादरे नांदेडपर्यंत; तीनवेळा आमदार झालेला शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर
साताऱ्यात राडा! मराठा आंदोलकांनी मंत्र्याच्या घरावर फेकले शेण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, कार्यालयावर दगडफेक
बापाची अस्थी घेण्यासाठी आलेल्या तीन लेकांमध्ये स्मशानभूमीतचं संपत्तीवरून तुफान हाणामारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.