पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने केली आत्महत्या

अहमदाबाद | शाहेरकोटदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न होऊन जवळपास दोन वर्षे झाली होती. पण अजूनही पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत आहे. यामुळे निराश झालेल्या पतीने टोकाचा निर्णय घेतला आहे.

पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने, निराश झालेल्या पतीने आत्महत्या केली आहे. गीता परमार असे या महिलेचे नाव असून, सुरेंद्रसिंह असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गीता परमार ही जयंती वकील चाळीत राहते. सुरेंद्रसिंह याची आई मूली परमार (५५) यांनी ६ ऑगस्ट रोजी गीताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्रसिंहला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी गीतावर केला आहे.

सुरेंद्रसिंहचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ साली त्याचे गीतासोबत लग्न झाले होते. दुसरीकडे गीताचा देखील घटस्फोट झाला होता. शाहेरकोटदा पोलीस ठाण्यात सुरेंद्रसिंहच्या आईने केलेल्या तक्रारीत ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

सुरेंद्रसिंहच्या आईने पुढे असेही सांगितले की, एकदा मी मुलाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी मुलगा आणि सून दोघेही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले मला दिसले. त्यानंतर मी मुलाला याबाबत विचारले होते.

त्यावेळी मला मुलाने सांगितले की, अजून कोणतेही शारिरीक संबंध झालेले नाहीत. गीता ही शारिरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्याचे त्याने आईला सांगितले. तिला कोणतेही संबंध त्याच्यासोबत ठेवायचे नव्हते, असा आरोप सुरेंद्रसिंहच्या आईने तक्रारीत केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही आत्महत्या करण्यास पतीला प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहेरकोटदा पोलिसांनी ३२ वर्षीय पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.