अशी तगडी ऑफर परत नाय! साडेतीन लाखांत नवीकोरी कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई | स्वत:च्या मालकीची चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाला वाटते. परंतु आपल्या खिशाला या कार गाड्यांच्या किंमती परवडत नाहीत. मात्र आता जास्त विचार करायची गरज नाही. तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये स्वस्त दरात मस्त कार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व कार साडेतीन लाखात तुमच्या घरी येणार आहे.  या गाड्या कोणत्या आहेत हे आपण पुढे पाहाणार आहोत.

अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट ठेवतात. या मोठ्या-मोठ्या डिस्काउंट ऑफर काही सण उत्सवानिमित्त असतात. तोपर्यंत ग्राहकांना वाट पहावी लागते पण आता ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. जर तुम्हा या पुढील कार घेण्यासाठी इच्छुक असाल तर खूप मोठी संधी आहे.

मारुती सुझुकी अल्टो, रेनॉ क्विड आणि डॅटसम गो, डॅटसन गो प्लस, डॅटसन रेडी गो या कारवर ऑफर्स दिल्या गेल्या आहेत. या ऑफर्स ३१ जानेवारी २०२१ पर्यतच असणार आहे. यामुळे या कार सर्वात स्वस्त मिळणार आहेत.

डॅटसन रेडी गो- या डॅटसन कंपनीच्या कारवर ग्राहकांना ३५ हजारांपर्यंत ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १५ हजारांचा कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच पंधरा हजारांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजारांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

डॅटसन गो प्लस – या गाडीवर ४० हजारांची ऑफर ठेवण्यात आली आहे. यामध्ये २० हजारांचा कॅश डिस्काउंट आणि २० हजारांची एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे.

या दोन कारची एक्स शोरुम किंमत पुढील प्रमाणे आहेत. डॅटसन गो ही चार लाख २५ हजार रुपयांपासून आहे. तर डॅटसन रेडी गो या कारची किंमत दोन लाख ८६ हजार रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी अल्टो या कारवर कंपनीने ३० हजारांचा डिस्काउंट ठेवला आहे. यामध्ये पंधरा हजारंचा कॅश आणि पंधरा हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश केला आहे. मारुती अल्टो ८०० या कारची किंमत २ लाख ९९ हजारांपासून सुरु होते. तर चार हजारांपर्यत कॉर्पोरेट बोनस ऑफर देण्यात आली आहे.

रेनॉ क्विड या कारवर ग्राहकांना तब्बल ५० हजारांचा डिस्काऊंट मिळणार आहे. कंपनीकडून ५.९९ टक्के व्याजदरावर ही कार आपल्यासाठी ठेवण्यात आली आहे. या कारची किंमत ३.१२ लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच ही कार २१ ते २२ किमी पर्यंत मायलेज देते.

तर कार खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी त्वरा करा. तुमच्या आवडीची कार खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही या डिस्काऊंट ऑफरचा फायदा घेऊ शकता. यावेळी स्वस्त आणि चांगल्या कंपनीची कार तुमच्या घरी येईल.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
आम्हाला ग्राहकांना डिस्काऊंट द्यायचे होते पण..; डीलर्सच्या खुलाशानंतर मारुती सुझुकीचे पितळ उघडे
कार घ्यायची आहे? बाईकच्या किंमतीत खरेदी करा ह्युंदाईची ‘ह्या’ शानदार कार्स
भारतीयांची कॉलर ताठ! रतन टाटांची टीसीएस कंपनी ठरली जगात सर्वात मोठी कंपनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.