मुंबईच्या हार्बर लोकल लोहमार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबुर ते गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान पतीने आपल्या पत्नीला लोकलच्या दरवाज्यातून ढकलून दिले आहे. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार, महिलेचं आधी एक लग्न झालेले होते. पतीशी पटत नसल्याने ती आपल्या ७ वर्षाच्या मुलीला घेऊन वेगळी राहत होती. त्याचदरम्यान ती अनवर शेख याच्या प्रेमात पडली. दीड महिन्यापूर्वी दोघांनी विवाह केला होता. पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आणि ती दुसऱ्या पतीसमवेत मानखूर्द परिसरात राहत होती. दोघेही मोलमजुरी करत होते. पण सध्या ते बेरोजगार होते.
नातेवाईकांना भेटून ते पुन्हा लोकलने मानखूर्दला आपल्या घरी निघाले होते. लोकलच्या दरवाजात दोघेही उभे राहून गप्पा मारत होते. त्याचदरम्यान अनवरने पत्नीला मिठी मारली. त्यानंतर तिला धक्का दिला. लोकलची गती जोरात असल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वेतील प्रवाशांनी अनवरला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अनवरने आपल्या पत्नीची हत्या करण्यामागचं कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास वडाळा लोहमार्ग पोलिस करत आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
बला.त्काराच्या आरोपाने धनंजय मुंडे अडचणीत; घेतली थेट शरद पवारांची भेट
ड्रग्स कनेक्शन प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ
वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याने घेतली हॉटेलमध्ये रुम; सायंकाळी सापडले धक्कादायक अवस्थेत
अनेक बॉलिवुड कलाकारांची डिलीव्हरी करणारे ‘हे’ ९१ वर्षांचे डॉक्टर आहेत तरी कोण?