हनिमूननंतर नवरा बायकोमध्ये भांडणे का होतात? जाणून घ्या यामागची कारणे

सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. अनेक तरूण व तरूणी आपला जोडीदार निवडत आहेत. काहींनी आपला जोडीदार आधीच निवडला आहे तर नुकतेच बऱ्याच तरूणांचे आणि तरूणींचे लग्न झाले आहे. त्यानंतर नवविवाहित जोड्या हनिमुनला जातील.

त्यांचे हनिमुनला जाण्याचे प्लॅन्स तयार होतील. लग्नानंतर खऱ्या आयुष्याची सुरूवात होते. एकमेकांना समजून घेण्याची खरी कसोटी सुरू होते. आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभराचा संसार करणे इतके सोपे नाही.

कारण एका सर्वेक्षणानुसार बहुतेक नवरा बायकोमध्ये हनिमुलनंतर भांडणे होतात. पण या भांडणामागची कारणे काय असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. एकदा लग्न झाले की आपण एकमेकांना डेट करण्याच्या फेजमधून बाहेर पडतो.

आपल्यावर एक जबाबदारी येते. लग्नानंतर बायकोचा किंवा नवऱ्याचा खरा चेहरा समोर येतो. दोघांचीपण वागणूक एकमेकांना कळते. मुलगी मुलाला इंप्रेस करण्यासाठी मेकअप करत नाही. चांगले कपडे घालून भेटायला येणे बंद करते.

तसेच मुलालासुद्धा लग्न झाल्यानंतर तिच्या आवडत्या गोष्टी करण्याची गरज पडत नाही. दोघांमध्ये शारिरीक आकर्षणही कमी झालेले असते. मग दोघांमध्ये वाद व्हायला लागतात. तिला वाटतं तो त्याची कर्तव्ये पार पाडत नाहिये आणि तिला वाटतं ती सतत मला ब्लेम करत आहे.

सतत वाद होतात आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. याते रूपांतर नंतर भांडणामध्ये होते आणि ही गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत पोहोचते. काही भांडणे आर्थिक कारणावरूनही होत असतात. दोघांच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे पैसे खर्च करण्याच्या बाबतीत दोघांचे विचार वेगवेगळे असू शकतात.

हे अनेकांच्या बाबतीत घडते आणि ही साधारण गोष्ट आहे. त्या दोघांनाही माहित असते काही गोष्टींमध्ये तडजोड करणे आवश्यक असते. एकमेकांच्या मतांना विचारात घेऊनच निर्णय घेण्यात शहाणपण आहे.

त्यामुळे गैरसमज होत नाहीत. पैसै कुठे आणि कसे खर्च करायचे याची योजना आखायला हवी. काहीजण फक्त सहन करतात आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत नाहीत. पण यामुळे संसार सुखी होत नाही. सुखी जीवनासाठी एकमेकांना वेळ देणेही आवश्यक आहे.

दोघांनाही कामाचे टेंशन असते. लग्नानंतर कोणीही आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाही. यामुळे शारिरीक आकर्षण कमी होते. अश्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर मोठीमोठी भांडणे टळू शकतात. एकमेकांना समजून घेण्यातच समजदारी आहे हे आजच्या काळातील कपल्सला समजणे गरजेचे आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
‘शेतकरी आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण…’
११ वर्षांचा मुलगा आई वडिलांचे अश्लील फोटो काढून करत होता ब्लॅकमेल, असा झाला पर्दाफाश
दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग भडकली, म्हणाली..
क्रुरतेचा कळस! बॉयफ्रेंडचा मर्डर करून त्याच्या शरीराचे तुकडे करून बनवली बिर्याणी  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.