‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदही आठवते का? आज दिसते अशी

फुलपाखरू मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी प्रेक्षक वैदही आणि मानसची केमिस्ट्री विसरू शकले नाहीत. या दोघांच्या जोडीने छोट्या पडद्यावर जादू केली होती. ही मालिका मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका होती.

मालिकेतून घराघरात पोहोचलेली हृता तरुणांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. हृताचे लाखो चाहते आहेत. तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर अनेक जण फिदा झाले आहेत. आजही प्रेक्षकांना हृताच्या मालिका खुप आवडतात.

हृतामुळची मुंबईकर असून तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ ला झाला. हृताचे शिक्षण दादरमध्ये झाले. तिने बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये डिग्री पुर्ण केली. कॉलेजमध्ये असताना हृताने तिचा अभिनय क्षेत्रातील कल ओळखला आणि या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ ही हृताची पहिली मालिका आहे. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. या मालिकेने तिला एवढी जास्त ओळख मिळवून दिली नाही. पण तिचा अभिनय मात्र खुप जास्त बदलत होता. तिचा अभिनय दिवसेंदिवस उत्तम होत होता.

त्यानंतर हृताने झी युवावरील ‘फुलपाखरू’ मालिकेत काम केले. फुलपाखरू मालिकेने हृताला घराघरात नेऊन पोहोचवले. तिची ही मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली. ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका होती.

हृताच्या सुंदरतेने अनेक जण घायाळ झाले. तिचा अभिनय पाहून हृता अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या नवनवीन संधी मिळत होत्या. त्यानंतर हृताने ‘दादा एक गुड न्युज’ नाटकातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

हृताचे दादा एक गुड न्युज आहे हे नाटकं खुप जास्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर हृताकडे एक नवीन संधी आली. ही संधी म्हणजे ‘अनन्या’.सध्या गाजत असलेल्या अनन्या नाटकाला मोठ्या पडद्यावरआणण्याचे काम दिग्दर्शक रवी जाधव करत आहेत.

या चित्रपटात काम करण्याची खुप मोठी संधी हृताला मिळाली. त्यासोबतच हृताने आत्ता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रदार्पण केले आहे. ती सुमित राघवनसोबत एका वेबसिरीजमध्ये काम करत आहे. लवकरच तिची ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.

हृताला अभिनयासोबतच डान्सची देखील खुप जास्त आवड आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आत्ता हृता मोठा पडदा गाजवण्यासाठी तयार आहे. फुलपाखरू मालिकेने हृताच्या आयुष्याला खुप मोठे वळण दिले आहे. या मालिकेने तिचे आयुष्य बदलुन टाकले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘कारभारी लयभारी’ मालिकेत कारभारीची भुमिका निभवणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

‘या’ महिला क्रिकेटरने विराट कोहलीला सगळ्यांसमोर लग्नासाठी प्रोपोज केले होते पण…

जाणून घ्या कोण आहे कंगना राणावतसोबत ट्वीटरवर वॉर करणारा दिलजीत दुसांज

‘ही’ व्यक्ती असेल अमिताभ बच्चनच्या २८०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.