Share

Hritik Roshan : ह्रतिकरोशनमुळे झोमॅटोला कोट्यावधींचा फटका; असं काय झालं की ग्राहकांनी केली बॉयकाॅट झोमॅटोची मागणी? जाणून घ्या…

Hritik Roshan

Hritik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या जाहिरातीच्या वादात सापडला आहे. त्याच्या या जाहिरातीला सगळीकडून विरोध केला जात आहे.

हृतिक रोशनने या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख केल्याने तो वादात अडकला आहे. या जाहिरातीमुळे रविवारपासून लोकांनी झोमॅटोला बॉयकॉट करा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु केला आहे. तसेच हृतिकवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“मला भूक लागली होती त्यामुळे मी महाकालकडून थाळी मागवली,” असे हृतिक रोशन या जाहिरातीत म्हणतो. तसेच या जाहिरातीमध्ये त्याने विविध शहरांची नावे घेतली आहेत. थाळी खायची ईच्छा झाली, उज्जैनमध्ये आहे म्हणून महाकालमधून ऑर्डर केली, असेही तो या जाहिरातीत म्हणतो. दरम्यान, उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा संदर्भ देत सोशल मीडियावर ही जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे.

तसेच या जाहिरातीमुळे उजैनच्या महाकाल मंदिरातील पुजारी दुखावले आहे. या सर्व प्रकरणाला त्यांनी विरोध केला आहे. महाकाल मंदिरातून अशा कोणत्याही थाळीची डिलिव्हरी केली जात आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना मोफत जेवण दिले जाते, असे मंदिरातील पुजारी म्हणाले.

त्यामुळे झोमॅटोने लवकरात लवकर ही जाहिरात थांबवली पाहिजे, असेही पुजारी म्हणाले. या जाहिरातीमुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे झोमॅटो कंपनी व हृतिक रोशनने माफी मागावी, अशी मागणीदेखील ते करत आहेत.

या सर्व प्रकरणामुळे ट्विटरवर ‘बॉयकॉट झोमॅटो’ हा ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. याविरोधात झोमॅटो कंपनी आणि हृतिक रोशनवर लोकांकडून टीका केली जात आहे. तसेच झोमॅटो कंपनी आणि हृतिक रोशन दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या
Rakesh Jhunjunwala: राकेश झुनझुनवालांचा गुंतवणूकीचा ‘हा’ सल्ला सर्वांनी ऐकलाच पाहीजे; आनंद महिंद्राचे आवाहन
Idi Amin: या तानाशाहने भारतीयांना देशातून हुसकावून लावलं होतं, म्हणाला, अल्लाहचा आदेश आहे की..
Ukraine: युक्रेनने रशियन सैन्याला दिले अत्यंत धोकादायक विष, मानवी शरीरावर होतो ‘हा’ घातक परिणाम
Eknath Khadse : २०१४ ला युती तोडण्याचा निर्णय माझा नव्हे तर..; एकनाथ खडसेंनी भाजपचे आतले सत्य काढले बाहेर

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now