… तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत – शिवसेना

मुंबई । गेले काही दिवस सरकारमध्ये अंतर्गत विरोध असल्याच्या चर्चा आहेत. यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नसल्याचे सांगत चर्चांवर पूर्णविराम दिला.

यावरून आता शिवसेनेने देखील विरोधकांवर निशाणा साधला आहे. चिनी सैन्याने गलवान खोऱ्यातून माघार घेतली पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत.

सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.

शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत.

ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असा सवाल करत शिवसेनेने विरोधकांवर टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी मध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. यावर शिवसेनेने भूमिका मांडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.