फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक

मुंबई | अलीकडच्या काळामध्ये प्रायव्ह्सी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अनेककदा आपण मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातो. यामुळे मोबाईल सुरु करण्यासाठी सॉफ्टवेअर शॉप किंवा मोबाईलच्या दुकानात जावं लागते. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात.

पण पासवर्ड विसरला असाल तर घर बसल्यावरही फोन अनलॉक करता येतो. यासाठी नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापराव्या लागतील? याबाबत आता आपण माहिती घेणार आहोत. यापुढे तुमचा फोन लॉक झाल्यास या काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा फोन अनलॉक होईल.

फोनचा लॉक पॅटर्न विसरला असाल किंवा इतर कोणीतरी पॅटर्न बदलला असेल तर फॉरगेट पासवर्डच्या मदतीने पॅटर्न बदला. फॉरगेट पासवर्ड बदलण्यासाठी जीमेल किंवा गुगल अकाऊंटची माहिती द्या. अलीकडे पासवर्ड सेट करताना तुम्हाला अनेक फोनमध्ये तुमच्या शाळेचं नाव किंवा बाकी प्रश्न विचारलेला असतो, फॉरगेट पासवर्ड वर क्लिक केल्यावर तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल त्याचे उत्तर दिल्यावर तुमचा फोन अनलॉक होतो.

दरम्यान, फोन अनलॉक करण्यासाठी आणखी एक ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. फोनचा लॉक पॅटर्न किंवा लॉक विसरलात तर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ करा. जवळपास एक मिनीटापर्यंत हा फोन स्विच ऑफ ठेवा. यानंतर फोनचे व्हॉल्यूम बटण, होम स्क्रीन बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. ही तिन्ही बटणं एकत्र दाबल्यानंतर तुमच्या फोनवर लाईट लागेल.

पुढे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाच ऑप्शन येतील. या ऑप्शनपैकी दुसरा ऑप्शन म्हणजेच Wipe data/ factory reset वर क्लिक करा. यानंतर फोन रिस्टार्ट करा. तुमच्या फोनमधून पासवर्ड आणि पॅटर्न लॉक गेलेलं असेल. अशा पद्धतीने तुम्ही फोन अनलॉक करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या
काळजी घ्या! चुकूनही स्कॅन करू नका क्यूआर कोड, अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
३५ वर्षांपूर्वी माझ्या घरातील पंतप्रधान, मग घराणेशाही कुठेय? राहुल गांधींचा भाजपाला सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.