गृहिणींसाठी कामाची बातमी! धान्याला किड लागू नये यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय  

मुंबई | घरात धान्याला कीड लागण्याच्या समस्यांनी अनेक गृहिणी नेहमीच त्रस्त असतात. साठवून ठेवलेल्या धान्यांना लागलेल्या किडीने ते धान्य मोठ्या प्रमाणात वाया जाते. याचबरोबर ते धान्य नीट करायलाही खूप वेळ जातो. यामुळे गृहिणी वेगवेगळे उपाय वापरून या समस्येपासून वाचण्याचा प्रयत्न करतात.

अनेकदा आपण यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या औषधांचा वापर करतो. मात्र हे आपण प्रामुख्याने टाळले पाहिजे. याचे कारण असे की, अशा औषधांमुळे आपल्या आरोग्यास धोका पोहचू शकतो. याचबरोबर लहान मुलांच्या जीवावर देखील बेतू शकते.

यामुळे आज आपण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला घरात धान्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करायचा असल्यास ते धान्य साठवण्यापूर्वी कडक उन्हात वळला. मग ते झाकण बंद कोरड्या डब्यात भरून ठेवा. यामुळे धान्य जास्त दिवस टिकेल.

तसेच धान्याला कीड लागू नये यासाठी धान्य भरताना त्यात थोडे वृत्तपत्राचे तुकडे टाका. वृत्तपत्राच्या वासाने धान्याला किडे अथवा जाळी होतं नाही. याचबरोबर हे धान्य जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ते वृत्तपत्राचे तुकडे सहज बाजूला करू शकता. हा घरगुती उपाय केल्याने तुम्ही धान्याला लागणाऱ्या किडी पासून वाचू शकता.

या समस्येवर आणखी एक घरगुती उपाय आहे. तो म्हणजे, कडुलिंबाची पाने तुम्ही धान्यांमध्ये मिसळू  शकता. यामुळे देखील धान्याचे किडीपासून संरक्षण होते. आणि याचा आरोग्यासही धोका पोहचत नाही. याशिवाय धान्य दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ! निवृत्तीचे वय ३० वर्षे की वयाची ५० वर्षे निर्णयासाठी समिती
‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’; पहा वरुण धवनच्या लग्नाचे सुंदर फोटो…
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; भावना व्यक्त करताना अश्रू अनावर, म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.