आपल्या कुटुंबात कोणीतरी कुटुंबप्रमुख असतो ज्याच्या नावाने पूर्ण घर ओळखले जाते. तसेच पूर्ण संपत्ती शक्यतो त्याच व्यक्तीच्या नावावर असते. जसे की शेतजमीन, बंगला किंवा घर अगदी गाडीपासून सर्व गोष्टी त्याच व्यक्तीच्या नावावर असतात.
पण त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर असा प्रश्न उभा राहतो की, ह्या संपत्तीचे समान भाग कसे करायचे? पण याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वारसा नोंद. जर तुम्ही वारसा नोंद केली नाही तर भाऊबंद किंवा इतर नातेवाईक कर वाईट वृत्तीचे असतील तर त्यांच्याकडून तुमच्या पूर्वजांच्या संपत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.
वारस नोंद वेळेवर करणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला वारस नोंदबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्या वेळेस आपण वारस नोंदणी करतो त्यावेळी त्याची नोंद सगळ्यात आधी नमुना ६ क या रजिस्टरमध्ये होते.
कोणाचे नाव वारस म्हणून लावायचे याबाबत ठराव मंजूर केला जातो. यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. जर कोणाला याबाबत काही तक्रार असेल तर त्यासाठी नोटीस पाठवली जाते. जर तक्रार नसेल तर मंडळअधिकाऱ्याच्याद्वारे किंवा तहसीलदार स्थानिक रिपोर्टच्या आधारावर सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी परवानगी देतो.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करताना त्यांच्या नावावर किती संपत्ती होती, त्यांचा किती तारखेला मृत्यू झाला, त्यांना एकूण किती वारसदार आहेत ही सगळी माहिती लिहावी लागते.
तसेच मृत्यू झालेल्या माणसाच्या नावावर असलेल्या जमीनीचे ८ अ चे उतारे आणि शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीबरोबर काय नाते आहे? आणि त्या वारसाचा सध्याचा पत्ता काय आहे? ही माहिती भरावी लागते.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेली व्यक्ती कोणत्या धर्माची आहे? कायद्याप्रमाणे वारसा हक्क जो आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. मृत्यूचा दाखला काढून आणायचा. वारस नोंदणीसाठी अर्ज देताना त्याबरोबर प्रतिज्ञापत्र, त्यानंतर ८ अ चे उतारे ज्यामध्ये संपुर्ण मालमत्तेची माहिती असेल अशी सर्व कागदपत्रे द्यावी लागतात.
यानंतर सर्व वारसांना बोलावले जाते. मग गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांच्या सल्ला घेतला जातो आणि एक ठराव केला जातो. ठराव मंजूर झाल्यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते. यानंतर सर्वाना नोटीस बजावली जाते.
शेवटी सगळ्या वारसदारांची नोंद केली जाते आणि जर त्यामध्ये काही चुका आढळून आल्या तर ही नोंद रद्दही केली जाऊ शकते. तर ही होती वारस नोंदणी प्रक्रियेची पूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.